ना. धों महानोर यांची विधान परिषदेतील भाषणे काळजाचा ठाव घेणारी - शरद पवार
X
माजी आमदार, जेष्ठ कवी ना. धो. महानोर यांचे वयाच्या 81 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांनी पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात आज सकाळी साडे आठ वाजता अखेरचा श्वास घेतला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निसर्ग कवीला ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण केली.
यावर शरद पवार यांनी ट्विट करत म्हणाले की " जवळचे मित्र महाराष्ट्राचा रानकवी ना. धो. महानोर यांच्या निधनाने अतिशय दुःख झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड खेड्यात गरीब शेतकरी कुटूंबात जन्मलेल्या ना. धों. चे बालपण कष्टात गेले पण कष्ट झेलताना त्यांचे संवेदनशील मन रानात रमले. अनेक चित्रपट गीतांनी मराठी माणसांच्या मनावर गारूड केले. ना. धों ची विधान परिषदेतील भाषणे देखील माणसाच्या काळजाचा ठाव घेत. ना. धो. खूपच हळवे, त्यात पत्नीच्या निधनाने ते आणखी खचले. मी , प्रतिभा त्यांच्या खचलेल्या मनाला उभारी देत राहिलो. पण अखेर हा वृक्ष उन्मळून पडला. ना. धो. चे निधन देखील पावसाळ्याच्या दिवसांत व्हावा हा योग मनाला चटका लाऊन जाणारा आहे. मी आणि माझ्या कुटूंबांतर्फे या मृदू मनाच्या निसर्ग कवीला श्रद्धांजली अर्पण करणारं ट्विट शरद पवार यांनी केलं आहे.