नमामी चंद्रभागा की गटारगंगा ?
कळे तिर्थ घडती एकवेळा, चंद्रभागा डोळा देखिलीया असे चंद्रभागेचे महत्त्व संतांनी अधोरेखित केलेले आहे. परंतु मंदिर समिती आणि सरकारच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे पवित्र चंद्रभागेची गटारगंगा झालेली आहे.
X
सकळे तिर्थ घडती एकवेळा, चंद्रभागा डोळा देखिलीया असे चंद्रभागेचे महत्त्व संतांनी अधोरेखित केलेले आहे. परंतु मंदिर समिती आणि सरकारच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे पवित्र चंद्रभागेची गटारगंगा झालेली आहे. चंद्रभागेचा नदीचे पाणी वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक बनले असल्याचे पंढरपूर येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश अंकुशराव यांनी निदर्शनास आणले आहे.
सध्या आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांची पंढरपूला जाण्याची लगबग सुरु झाली आहे. अनेक जण या दिवशी पंढरपूरमधील विठ्ठल-रुखमीणी मंदिराच्या दर्शनासाठी जात असतात. लाखोंच्या जनसंख्येने लोक पंढरपूरात दाखल होतात. आषाढी एकादशी निमित्त लाखो भाविक हे पायीवारी पालखी सोहळ्यात सहभागी होतात.
"सकळे तिर्थ घडती एकवेळा, चंद्रभागा डोळा देखिलीया" या अभंगामध्ये चंद्रभागेचे महत्त्व संतांनी सांगितलेले आहे. पायी वारी करुन पंढरपुरात पोहचलेले वारकरी चंद्रभागेच्या पाण्यात स्नान करत असतात. परंतु वाढत्या प्रदूषणामुळे हे पाणी प्रदूषीत बनलेले आहे. या पाण्यात स्नान केल्याने वारकऱ्यांना त्वचारोग तसेच इतर आजार होऊ शकतात
चंद्रभागेच्या स्वच्छतेकडे मंदिर समितीचे दुर्लक्ष
चंद्रभागा नदीच्या स्वच्छतेकडे मंदिर समितीत असलेल्या महाराजांनी दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप करत ठेकेदार नदीकडे फिरकत नसल्याची माहिती
सामाजिक कार्यकर्ते गणेश अंकुशराव यांनी दिली आहे.
नमामी चंद्रभागा योजनेचे काय झाले.
नमामी गंगा च्या धर्तीवर चंद्रभागेच्या स्वच्छतेसाठी स्वच्छतेसाठी नमामी चंद्रभागा ही योजना सुरू केली होती. परंतु अद्यापपर्यंत चंद्रभागा नदीतील घाण तशीच आहे. मोठा गाजावाजा करून निर्माण केलेल्या या योजनेचा फज्जा उडाल्याची स्थिती आहे.
मुख्यमंत्र्यांनी कायमस्वरूपी उपाययोजना करावी
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चंद्रभागा नदीच्या स्वच्छतेसाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेण्याची मागणी केली जात आहे.
स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी
चंद्रभागेच्या स्वच्छतेसाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी किंवा पालिकेतील स्वच्छता कर्मचाऱ्यांची भरती करुन या परिसरात कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी वारकरी करत आहेत.