Home > News Update > Buldhana Bus Accident : समृद्धी महामार्गावर खासगी बसचा अपघात, बस जळून खाक, 25 जणांना गमवावा लागला जीव

Buldhana Bus Accident : समृद्धी महामार्गावर खासगी बसचा अपघात, बस जळून खाक, 25 जणांना गमवावा लागला जीव

नाशिकनंतर समृद्धी महामार्गावरही खासगी बसचा भीषण अपघात झाला. यामध्ये 25 जणांना जीव गमवावा लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Buldhana Bus Accident : समृद्धी महामार्गावर खासगी बसचा अपघात, बस जळून खाक, 25 जणांना गमवावा लागला जीव
X

गेल्या वर्षी नाशिक येथे बसला आग लागल्याने प्रवाशांना जीव गमवावा लागला होता. त्यानंतर आता अशाच प्रकारची घटना समृद्धी महामार्गावर घडली आहे. यामध्ये आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाला आहे.

समृद्धी महामार्गावर खासगी प्रवासी बसचा अपघात होऊन बसने पेट घेतल्याने बसमधील 25 जणांचा मृत्यू झाला आहे. हा भीषण अपघात सिंदखेड राजा नजीक पिंपळखुटा फाट्याजवळ पहाटे दीड वाजेच्या सुमारास घडला आहे. दरम्यान अपघातामधील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


नागपूरवरून खासगी प्रवासी बस ही समृद्धी महामार्ग मार्गे पुण्याला जात होती. दरम्यान सिंदखेड राजा नजीक बसचे टायर फुटल्याने ही बस रस्त्यावर उलटली. या दरम्यान सिमेंट रस्त्यावर घर्षण होऊन बसने पेट घेतला आणि बघता बघता आगीने रौद्ररुप घेतले. परंतू अर्धवट झापेत असलेल्या प्रवाश्यांना बसमधून बाहेर पडता न आल्याने यात ही मोठी झाली, अशी माहिती समोर आली आहे.



दरम्यान पहाटे पाच वाजेच्या सुमारास जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांनी घटनास्थळी भेट दिली. तेव्हा घटनास्थळावर पाच ते सहा रुग्णवाहिका, सिंदखेड राजा, किनगाव राजासह लगतच्या पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी बचावाचे काम करत होते. मात्र यामध्ये प्रवाशांचा आगीने मृत्यू झाल्याने त्यांची ओळख पटवणे अवघड झाले आहे. त्यामुळे यासंदर्भात डीएनए टेस्टच्या सहाय्याने ओळख पटवून मृतदेह त्यांच्या नातेवाईकांकडे सोपवले जातील. यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांशी चर्चा केली असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली.




विदर्भ ट्रॅव्हल्सची MH 29 BE - 1819 क्रमांकाची ही बस नागपूर येथून पुण्याकडे जात होती. 30 जून रोजी नागपुर वरून सायंकाळी 5 वाजता पुण्यासाठी ही बस निघाली होती. 1 जुलै च्या रात्री 1.22 मिनिटाने धावत्या गाडीचे समोरील टायर अचानक निघाल्याने ट्रॅव्हल्स समृद्धी महामार्गावरील पुलावरील दुभाजकाला धडकून पलटी झाली. त्यानंतर काही मिनिटामध्ये बसने घेतला. यासंदर्भातील प्राथमिक अंदाजानुसार 25 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. तर 8 जण बचावले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती सुत्रांनी दिली. मात्र या घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासन आणि फायर ब्रिगेड घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर बचावाचे काम सुरु होते.

हे ही पाहा...

Updated : 1 July 2023 8:34 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top