Home > News Update > माझ्या ट्विट चा अर्थ लवकरच कळेल : संजय राऊत

माझ्या ट्विट चा अर्थ लवकरच कळेल : संजय राऊत

माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांचे पत्र सनसनाटी आणि खळबळजनक आहे. लोक म्हणतात हा लेटर बॉम्ब मात्र यात सत्यता किती आहे हे मुख्यमंत्री आणि पवार साहेब तपासून बघतील. सरकारमधल्या प्रत्येक घटकाने आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे, माझ्या माझ्या ट्विट चा अर्थ लवकरच कळेल अशी प्रतिक्रीया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

माझ्या ट्विट चा अर्थ लवकरच कळेल : संजय राऊत
X

माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या पत्राने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून आघाडी सरकारचं बैठकांचं सत्र सुरु असून भाजप राज्यभर आंदोलन करत आहे. याबाबत नाशिकमध्ये बोलताना संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात नक्कीच हा चर्चेचा विषय आहे. नक्कीच सनसनाटी आणि खळबळजनक पत्र आहे. लोक म्हणतात हा लेटर बॉम्ब मात्र यात सत्यता किती आहे हे मुख्यमंत्री आणि पवार साहेब तपासून बघतील. या प्रकरणी स्वतः अनिल देशमुख यांनी पत्राच्या चौकशीची मागणी केली आहे. मात्र प्रत्येकाने नक्कीच आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे . अशा प्रकारचे आरोप होत आहेत हे दुर्दैवी आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

मात्र पोलीस प्रशासन हा कोणत्याही सरकारचा कणा असतो. महाराष्ट्राला कणा आहे असं आपण म्हणतो.

पोलिसांकडे आम्ही कणा म्हणून पाहतो. आमची राजवट देखील उत्तम चालली आहे , पण काही तरी दुरुस्त करावं लागेल, असं संजय राऊत म्हणाले.

आरोप करणारे माजी पोलीस आयुक्त आहेत. एका प्रकरणात त्यांना पदावरून जावं लागलं आहे.

त्यांच्या कामाबाबद्दल कौतुक असून त्यांच्या पत्रावर तपास करावा असे स्वतः गृहमंत्र्यांनी सांगितलं आहे.

योग्य भूमिका आणि निर्णय घेण्यासाठी पवार साहेब भूमिका पार पाडतील मी पवार साहेबांशी दिल्लीत भेटेल असं राऊत म्हणाले.

विरोधी पक्षाने मागणी केली म्हणून सरकार चालत नाही. 72 तासात सरकार वर शिंतोडे उडाले हे मान्य करण्याचा मोठे पणा माझ्याकडे आहे.मुख्यमंत्र्यानी सरकारची प्रतिमा चांगली ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न केला.

काही गोष्टींवर योग्य वेळी निर्णय घेणे अपेक्षित होत.पण सत्तेपुढे शहाणपण नसत. माझ्या ट्विट चा अर्थ लवकरच कळेल असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

Updated : 21 March 2021 12:11 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top