माझं वक्तव्य मोडतोड करून दाखवण्यात आलं: जयंत पाटील
X
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली होती. इस्लामपुरात एका स्थानिक चॅनेलशी बोलताना जयंत पाटलांनी मुख्यमंत्रिपदाची राजकीय महत्त्वाकांक्षा बोलून दाखवली. त्यानंतर आता विरोधकांनीही जयंत पाटलांवर चांगलाच हल्ला चढवला. अखेर जयंत पाटलांनीही या सर्व प्रकरणावर स्पष्टीकरण द्यावं लागलं.
माझं वक्तव्य मोडतोड करून दाखवण्यात आलं. मला प्रश्न वेगळा विचारला होता, मी त्यावर बोलताना म्हटलं होतं की "आमच्या पक्षाचं संख्याबळ कमी आहे, मग आमचा मुख्यमंत्री होणार कसा?, असं जयंत पाटील आता स्पष्टीकरण देताना सांगताहेत. राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार हा प्रश्न उपस्थित का होत आहे. माझं बोलणं ट्विस्ट करून टाकलंय. चुकीची मुलाखत मोडतोय करून दाखवलीय. मी आज ट्विट करून नेमकं काय म्हणलोय ते सांगितलंय. मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल का, असं विचारलं होतं. त्यावर मी स्पष्टीकरण दिलंय. अनेक वर्षे काम करतोय, आज आमचं संख्याबळ नाही, पवार साहेब आमचे अंतिम निर्णय घेत असतात हे मी सांगितलं होतं.
पण वक्तव्य ट्विस्ट करून दाखवलंय, असंही जयंत पाटील म्हणालेत. विशेष म्हणजे या सर्व प्रकरणावर अजित पवारांनीही भाष्य केलंय. "जयंत पाटील साहेबांनी जी इच्छा व्यक्त केली आहे, त्या इच्छेला मी पाठिंबा देतो", असं अजित पवार म्हणालेत हे विशेष.