Home > News Update > ST संप लांबवण्याचा ठाकरे सरकारचा कट, गोपीचंद पडळकरांचा आरोप

ST संप लांबवण्याचा ठाकरे सरकारचा कट, गोपीचंद पडळकरांचा आरोप

ST संप लांबवण्याचा ठाकरे सरकारचा कट, गोपीचंद पडळकरांचा आरोप
X

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी विलिनीकरणाच्या मागणीसाठी सुरू केलेल्या संपाला आता शंभर दिवस झाले आहेत. या संपामुळे राज्यातील लाखो नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहेत. ग्रामीण भागातील लोकांची यामुळे खूप गैरसोय होते आहे. मात्र अजूनही या संपावर तोडगा निघालेला नाही. मध्यंतरी राज्य सरकारने पगारवाढ, वेतननिश्चिती यासंदर्भात घोषणा केली तसेच काही मागण्या देखील मान्य केल्या आहेत. मात्र बहुतांश एसटी कर्मचारी संपावर ठाम राहिले आहेत. त्यामुळे एसटीचे बिघडलेले चक्र पूर्वपदावर येऊ शकलेले नाही. मात्र आता यावरुनच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

गोपीचंद पडळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातुन व्हिडीओ शेअर करुन सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. "एसटी संप मिटवण्यापेक्षा तो अधिक कसा चिघळेल असा सुनियोजित कट सरकार पद्धतशीरपणे रचत आहे. एकीकडे कर्माचाऱ्यांना रुजू होण्यास सांगायचं आणि दुसरीकडे कर्मचाऱ्यांना एसटीचे १ ते २ कोटींचे नुकसान झालं आहे, असे सांगून कर्मचाऱ्यांना नोटीस पाठवायची, असा प्रकार सरकारने सुरू केल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

कोर्टाच्या आदेशानंतर सरकारने विलीनकरणाच्या मागणीबाबत अभ्यास करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाच्या बाबतीत समितीने अहवाल सरकारकडे दिला. परंतु सरकार आठवड्याची मुदत मागत आहे. म्हणजेच सरकारला हा संप कसा चिघळतोय आणि आपल्याला त्यामध्ये कशी नवीन भरती करता येईल,नंतर त्या कर्मचाऱ्याला काढुन टाकायचं आणि नवीन कर्मचाऱ्यांची भरती करुन त्यामध्ये सरकारला टक्केवारी घेता येईल, असा घोटाळा करता येईला.दुसऱ्या खात्यात जसा नोकरभरतीचा घोटाळा झाला तशा पद्धतीने एसटीच्या कर्मचाऱ्याच्या भरतीत मोठा घोटाळा करायचा असा कट सरकारचा यामध्ये दिसुन येतोय. असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.


Updated : 12 Feb 2022 4:48 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top