पदोन्नतीमधील आरक्षण : १०१ तरुणांनी अजित पवार यांना रक्ताने लिहिले पत्र
टीम मॅक्स महाराष्ट्र | 1 March 2021 7:44 PM IST
X
X
बढतीमधील आरक्षण सेवाज्येष्ठतेनुसार देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. पण आता यावरुन मागासवर्गीय संघटना आक्रमक झाल्या आहेत. महाविकास आघाडीने बढतीमधील आरक्षण संपवलं असा आरोप करत आता मंत्र्यांच्या घरासमोर पोस्टरबाजी करण्याचा निर्णय या संघटनांनी घेतला आहे. महाविकास आघाडीने विश्वासघात केल्याचा आरोप करत १०१ तरुणांनी आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना रक्ताने पत्र लिहिले आहे.
त्याचबरोबर मंत्र्यांच्या बंगल्यासमोर निदर्शनं करण्याचा इशारा देण्यात आला आहे. अजित पवार, नितिन राऊत, वर्षा गायकवाड, धनंजय मुंडे यांना कोर्टाची कोणताही स्टे नोटीस नसताना आरक्षण थांबवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. फडणवीस सरकारने बढतील आरक्षण थांबवलं होतं पण महाविकास आघाडीने तर ते संपवूनच टाकलं असाही आरोप या तरुणांनी केला आहे.
Updated : 1 March 2021 7:44 PM IST
Tags: Ajit pawar
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire