Home > News Update > जामिनासाठी मदत न केल्याच्या रागातून एकाची हत्या;आरोपीला गुजरातमधून अटक

जामिनासाठी मदत न केल्याच्या रागातून एकाची हत्या;आरोपीला गुजरातमधून अटक

जामिनासाठी मदत न केल्याच्या रागातून एकाची हत्या;आरोपीला गुजरातमधून अटक
X

जामिनासाठी मदत न केल्याच्या रागातून तरुणाची हत्या केल्याची घटना कल्याण मधील बारावे येथे घडली असून हत्या करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी गुजरातमधील गोधरा मधून अटक करण्यात आली आहे. तर या प्रकरणात आणखी आरोपी असण्याची शंका मृताच्या कुटुंबाने व्यक्त केली असून पोलिसांनी योग्य तपास करून न्याय देण्याची मागणी कुटुंबाने पोलिसांकडे केली आहे.

कल्याण मधील बारावे परिसरात राहणारा मुकेश रमेश सरदेसाई व शेरखान मुद्दिंग खान हे दोघे चांगले मित्र असून गेले काही दिवसापूर्वी हत्यार बाळगल्याच्या आरोपात कारागृहात होते यावेळेस मुकेशने आपला मित्र शेरखानला जामीनावर सुटका करण्यास मदत न करता स्वतः जामीन मिळवत आपली सुटका करून घेतली. मात्र, शेरखानला जामीनवर सुटका करण्यासाठी कोणतीच मदत केली नाही. अखेर अनेक दिवस कारागृहात राहिल्यानंतर शेरखानची जामीनावर सुटका झाली, त्यानंतर शेरखाने मुकेश बरोबर आपली मैत्री तोडून टाकली मात्र एकाच परिसरात राहत असल्याने मुकेश शेरखानला बोलवून वारंवार मारहाण करत त्रास देत असे. अखेर या त्रासाला संपवण्यासाठी शेरखाने एक कट रचला 7 ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास मुकेशला घरातून एकटा बाहेर आलेला पाहून शेरखाने धारदार शस्त्राने मुकेशची हत्या केली. हत्येनंतर समशेर आपला मोबाईल बंद करून तेथून फरार झाला. हत्येची माहिती मिळताच खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना सीसीटीव्ही मध्ये शेरखान दिसला पोलिसांनी लगेच वेगवेगळ्या टीम बनवत शेरखानच्या सर्व मित्रांना ताब्यात घेत शेरखानच्या फोनची वाट पाहायला लागले. अखेर गावी जाण्यासाठी शेरखानला पैसे कमी पडल्याने शेरखानने आपल्या मित्रांना फोन केले आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पोलिसांनी लगेचच फोनची माहिती घेत शेरखानला गुजरातमधील गोधरामधून अटक केली.

Updated : 12 Oct 2021 7:25 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top