Home > News Update > जळगाव शहरात सलग दुसऱ्या दिवशी हत्येचा थरार

जळगाव शहरात सलग दुसऱ्या दिवशी हत्येचा थरार

जळगाव शहरात सलग दुसऱ्या दिवशी हत्येचा थरार
X

जळगाव शहरातील सलग दुसऱ्या दिवसाची पहाट खुनाच्या थराराने सुरू झाली. निमखेडी शिवार परिसरात जन्मदात्याचा खून झाल्यानंतर आज शहरात पुन्हा एक खून झाल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

शहरातील आंबेडकरनगराच्या बाजूच्या परिसरातील राजू पंडित सोनवणे या व्यक्तीची दगडाने डोके ठेचून हत्या करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान लागोपाठ दुसऱ्या दिवशी शहरात खून झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे

राजू सोनवणे हे पत्नी व दोन मुले यांच्यासोबत लक्ष्मीनगरात वास्तव्यस होते. आंबेडकर नगर परिसरात राजू यांच्या आई राहत होती. आईला भेटण्यासाठी रविवारी गेले असता रात्री तेथेच मुक्कमी राहिले. वरच्या मजल्यावर ते झोपले होते. ते सकाळी खाली आले नाही म्हणून आईने मुलाला पाहण्यासाठी वर पाठविले. यावेळी सदर प्रकार उघडकीस आला.

निमखेडी रोड परिसरात एका व्यक्तीला कौटुंबिक वादातून त्याच्याच दोन्ही मुलांनी संपवण्याची धक्कादायक घटना घडली होती. याप्रकरणी दोन्ही मुलांना अटक करण्यात आली आहे. खुद्द जन्मदात्या बापाचा खून करण्याच्या या कृत्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान यानंतर आज शहरात पुन्हा एक खून झाला आहे. हा खून कुणी आणि का केला? याबाबत पोलीस तपास करत आहेत

Updated : 13 Sept 2021 5:49 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top