Home > News Update > मुंबईचा पाणीसाठा २७ टक्क्यांवर, महापालिकेसमोर संकट...!

मुंबईचा पाणीसाठा २७ टक्क्यांवर, महापालिकेसमोर संकट...!

मुंबईचा पाणीसाठा २७ टक्क्यांवर, महापालिकेसमोर संकट...!
X

पाणी हे नैसर्गिक स्त्रोत असून ते आपल्या जिवनाचा अविभाज्य घटक आहे. आपल्या दैनंदिन जिवनात पाण्याचं अनन्यसाधारण महत्व आहे. पण उन्हाळ्याची चाहूल लागताच पाण्याचे साठे कमी होऊ लागतात. यंदा मुंबईकरांसाठी पाणी हा चिंतेचा विषय ठरला आहे, कारण मुंबईतल्या पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांचा पाणीसाठा आता केवळ २७ टक्के शिल्लक राहिला असून हे पाणी जून महिन्याच्या अखेरपर्यंतच पुरणार आहे. जूननंतर पाऊस लवकर आला नाही तर नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. तर राज्यात इतर ठिकाणीही पाण्याचं प्रमाण ३५ टक्क्यांपर्यंत खाली आलं असून पाणीटंचाईची भीषण स्थिती ओढवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांची स्थिती काय आहे?

मुंबईतला मोडकसागर, उर्ध्व वैतरणा, तानसा, भातसा, मध्य वैतरणा, विहार आणि तुळशी या सातही धरणातून प्रतिदिवस ३,९०० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरठा मुंबईकरांना होतो. एकुण १४ लाख, ४७ हजार, ३६३ दशलक्ष लिटर एवढी पाणी साठवण्यची क्षमता या सातही धरणांची आहे. रविवारी मोडकसागर धरणात २४.९७ टक्के, उर्ध्व वैतरणात ३६.६० टक्के, तानसामध्ये ४१,८६ टक्के, भातसा धरणात २६.२४ टक्के, मध्य वैतरणात १२.१३ टक्के, विहारमध्ये ३९.६१ टक्के, तर तुळशीमध्ये ४४.२० टक्के एवढ्या पाणीसाठ्याची नोंद झालेली आहे. या सर्व धरणांमध्ये एकुण सरासरी(Average) २७.८१ टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. भांडूप येथील जलशुध्दीकरण केंद्राच्या परिक्षण कामांमुळे शहरात १५ टक्के पाणी कपात होत असल्यामुळे सातत्याने पाण्याच्या प्रमाणात होत असणारी घट हा मुंबईकरांच्या चिंतेचा विषय ठरत आहे.

Updated : 8 April 2024 12:26 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top