Mumbai Taxi | मुंबईतील 'प्रीमियर पद्मिनी' टॅक्सी चा प्रवास संपला
X
मित्रानो आपणं फोटोत पाहाताय या टॅक्सीचा आजचा शेवटचा दिवस आहे. ही टॅक्सी सेवा 'काली-पिली' म्हणून ओळखली जात होती. मुंबईतून ही टॅक्सी (Taxi)आता कालबाह्य होणार आहे. 'प्रीमियर पद्मिनी' टॅक्सी म्हणून नावारुपास आणि सर्वसामान्यापासून ते श्रीमंत लोकांच्या सुख-दु:खात किंवा मुंबई दर्शन असेल आडीअडचणीत प्रत्येक मुंबईकरांच्या जीवनातील भाग ही पद्मिनी टॅक्सी होती. कोणताही चित्रपट, मालिका असो ज्यांना देशाची आर्थिक राजधानी मुंबई दाखवायची असेल तर या टॅक्सीच्या चित्रीकरणापासून सुरूवात झालेली आपण नक्कीच पाहीली असाल या टॅक्सीचा प्रत्येक्षात प्रवास अनुभवला असाल. माटूंगापासून मुंबईच्या पूढच्या प्रवासात या टॅक्सीचा मुंबईकरांच्या जीवनात आणि स्ट्रगलींग लाईफमध्ये महत्वाचा वाटा आहे. परंतू आजपासून ही टॅक्सी बंद होणार आहे. ही 'काली-पिली' Black-yellow Taxi टॅक्सी प्रत्येक मुंबईकरांच्या कायम लक्षात राहणार आहे.