मुंबईत चेंबूरमध्ये लॉकडाउन? डॉक्टर म्हणतात...
X
राज्यात ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्याचबरोबर मुंबईतील चेंबूर भागात देखील कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. सोमवारी 493 कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले होते. तर 3 रुग्णांचा मृत्यू झाला होता. या भागात 5 टक्के कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. या संदर्भात लोकसत्ता ऑनलाईन ने 'मुंबईत पुन्हा करोना संकट; चेंबूरमध्ये लॉकडाउन?' अशा आशयाचं वृत्त दिलं आहे.
गेल्या आठवड्यात चेंबूरमध्ये 15 पेक्षा कमी रुग्ण आढळत होते. मात्र, ता रुग्णांची संख्या वाढली आहे.या संदर्भात हिंदूस्थान टाईम्स ने देखील 'Mumbai's Chembur area to go under lockdown?' या ठळक मथळ्याखाली वृत्त दिलं आहे.
या संदर्भात मुंबई महानगरपालिकेचे एम वेस्ट वैद्यकीय अधिकारी डॉ. भुपेंद्र पाटील यांच्याशी बातचित केली असता...
गेल्या काही दिवसांपासून चेंबूरमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. लोक कोरोनाबाबत योग्य ती काळजी घेत नाहीत. त्यामुळं आम्ही आठवड्याभर निरिक्षण करणार आहोत. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे. चेंबूर मधील टीळकनगर, सुभाषनगर या भागात रुग्णांची संख्या अधिक आहे.