मुंबईची पुन्हा तुंबई, शाळेतही शिरले पाणी
X
पावसाळा सुरू झाली की मुंबईतील नागरिकांना मुंबईची तुंबई होण्याची भीती असते. तर यंदा पावसाळा सुरू झाला असतानाच मुंबईतील कुर्ला भागातील संत वालकर शाळेत पाणी शिरले आहे. याचा वेध घेणारा मॅक्स हिंदीचे संपादक मनोज चंदेलिया यांचा ग्राऊंड रिपोर्ट...
गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे. त्यातच काही ठिकाणी संततधार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचे दिसून येत आहे. त्यातच मुंबईतील कुर्ला येथील संत वालकर शाळेत पाणी शिरले आहे. तर मुंबईच्या अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे.
मॅक्स महाराष्ट्रने विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, दरवर्षी शाळेत पाणी शिरते. त्यामुळे आमच्या शिक्षणावर परिणाम होतो. तसेच ही शाळा मुंबई महापालिकेची असल्याची माहिती यावेळी विद्यार्थ्यांनी दिली.
यावेळी संत वालकर शाळेच्या वर्गात गुडघ्याइतके पाणी साचल्याचे दिसून आले. तर पाणी साचल्यामुळे शैक्षणिक साहित्याचे नुकसान होत असल्याचे शिक्षकांनी सांगितले. दरवर्षी शाळेत पाणी साचूनही महापालिका यासंदर्भात कोणताही निर्णय घेत नसल्याने विद्यार्थी व पालकांनी नाराजी व्यक्त केली. तर महापालिका कायम दुर्लक्ष करीत असल्याची भावना यावेळी पालकांनी व्यक्त केली.