Home > News Update > आणखीन एक ठाकरे गटातील नेत्या अडचणीत?

आणखीन एक ठाकरे गटातील नेत्या अडचणीत?

आणखीन एक ठाकरे गटातील नेत्या अडचणीत?
X

एस.आर.ए. योजनेत फसवणूक केल्याप्रकरणी वांद्र्यातील निर्मल नगर पोलिसांनी (Nirmal Nagar Police Station) मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात त्यांच्या सोबत त्यांचा मुलगा साईप्रसाद पेडणेकर व इतर पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. भाजपचे नेते सोमय्या (Kirit Somaiya) यांनी याबाबत ट्वीट करत माहिती दिली. वरळीतील गोमाता नगर मधील एस.आर.ए.प्रकल्पात फसवणूक केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी साईप्रसाद पेडणेकर यांना व संबंधित कंपनीच्या विरोधात समन्स बजावण्यात आले आहे.

वरळी येथील गोमाता इमारत (Worli Gomata SRA) ही झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत बांधण्यात आली आहे. किशोरी पेडणेकर यांनी बेकायदेशीरपणे या इमारतीमधील सदनिका बळकावल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर महापालिका आणि एसआरए प्राधिकरणाने घर आणि कार्यालय सील केले होते. या कारवाईनंतर किशोरी पेडणेकर यांनी आपला या सदनिकांशी संबंध नसल्याचे म्हटले होते.

पेडणेकरांच्या कारवाई नंतर किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर किरीट सोमय्या यांनी एक व्हिडिओ जारी करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आम्ही गेल्या एक वर्षापासून गुन्हा दाखल व्हावा म्हणून प्रयत्न करत होतो, गेल्या वर्षभर आम्ही पाठपुरावा करत होतो. एस. आर. ए. मधील गाळे ढापुन स्वतःच्या कंपनीचे अनधिकृत कार्यालय उघडणे असा गुन्हा दाखल झाला आहे असे भाजप नेते किरीट सौमय्या यांनी सांगितले आहे.

Updated : 15 Jan 2023 10:13 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top