मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने चौकशीसाठी बजावली परमबीर सिंग यांना नोटीस
X
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातील भ्रष्टाचाराच्या आरोपांविषयी चौकशी करणाऱ्या, मुंबई उच्च न्यायालयाच्या आयोगासमोर जबाब नोंदवण्यासाठी परमबीर सिंग टाळाटाळ करत असल्याने वारंवार समन्स बजावूनही ते हजर न राहिल्याने आयोगाने त्यांच्याविरोधात यापूर्वी दोनदा जामीनपात्र अटक वॉरंट बजावले होते. आता मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने चौकशीसाठी परमबीर सिंग यांना नोटीस बजावली आहे. 12 ऑक्टोबर रोजी हजर राहण्यासाठी ही नोटीस बजावण्यात आल्याची माहिती मिळत आहे. परमबीर सिंग यांच्या हरियाणा येथील घरी तसेच मुंबईतील नीलिमा येथील घरी ही नोटीस देण्यात आली आहे. गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये परमबीर सिंग, सचिन वाजे आणि इतरांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान हा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. आता मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने चौकशीसाठी परमबीर सिंग यांना नोटीस बजावली आहे.