मुंबई उच्च न्यायालयाचा एसटी कर्मचाऱ्यांना सलगदुसरा अल्टीमेटम : २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू व्हा
X
एसटी कर्मचाऱ्यांना(ST workers)आता दुसरा अल्टीमेटम दिला आहे.मुंबई हायकोर्टाने (mumbai high court)संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्यास सांगितले आहे. संपामुळे दाखल झालेले गुन्हे आम्ही मागे घेण्याबाबत आदेश देऊ. संपामुळे एकही मृत्यू झालेला नकोय.सिंह आणि कोकरुच्या वादात आम्हाला कोकरुला वाचवावे लागेल असं कोर्टाने यावेळी स्पष्ट केलं आहे.
सर्व कर्माचाऱ्यांना (ST workers) पुन्हा अशी कृती करणार नाही असा इशारा देऊन सेवेत सामावून घ्यावे असे आदेश महामंडळाला (MSRTC) दिले आहेत.या कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन,ग्रॅच्युटीचा लाभ देण्याबाबत आदेश देण्याचही कोर्टाने (HC) स्पष्ट केलं आहे. कोर्टाने संपकरी कर्मचाऱ्यांच्या शक्य त्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे.आता एसटी संपाचा तिढा अखेर सुटण्याची चिन्ह दिसत आहेत.
कोर्टाने कर्मचाऱ्यांना कोविडचा (COVID19) भत्ता देण्यासही सांगितलं असल्याची माहिती संपकरी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी दिली. एका कर्मचाऱ्याला ३०० रुपये प्रमाणे प्रत्येकी ३० हजार देण्यास सांगितलं असल्याची माहिती त्यांनी दिली.
याआधी बुधवारी झालेल्या सुनावणीत सध्याच्या कसोटीच्या काळात आपले उपजीविकेचे साधन गमावू नका आणि जनतेला त्रास देऊ नका, असे आवाहन करत कोर्टाने संपकरी कर्मचाऱ्यांना १५ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याची सूचना केली होती.संपकऱ्यांना एक संधी देऊन त्यांच्यावरील कारवाईच्या निर्णयाचा पुर्नविचार करण्याबरोबरच त्यांना पुन्हा सेवेत सामावून घ्या, अशी सुचनाही कोर्टाने महामंडळाला केली आहे.