सचिन वाझे प्रकरण भोवले, पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली
X
सचिन वाझे प्रकरणात सरकारची नाचक्की झाल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी पहिला मोठा निर्णय घेतला आहे. या प्रकरणाचा सगळ्यात पहिला धक्का मुंबईच्या पोलीस आयुक्तांना बसला आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली आहे. राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांच्याकडे मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार देण्यात आला आहे. तर रजनीश शेठ यांच्याकडे पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जवाबदारी देऊन परमवीर सिंह यांना होमगार्ड विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महाराष्ट्राच्या आयपीएस लॉबीतील सर्वात मोठी खांदेपालट करून शमवला आहे. देशमुख यांनी ट्विटर अकाऊंटवरून परबमीर सिंह यांची गच्छंती जाहीर केली. ठाकरे सरकारमध्ये आयपीएस अधिकाऱ्यांमधील ही सर्वात मोठी बदल्यांची घोषणा आहे. मुंबई पोलिस आयुक्तपदी हेमंत नगराळे यांची बदली झाली आहे. हेमंत नगराळे यांच्याकडे सध्या राज्याच्या महासंचालकपदाची प्रभारी म्हणून जबाबदारी होती.
दरम्यान या बदल्यांचे स्वागत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. राऊत यांनी ट्विट करुन यावर प्रतिक्रिया दिली आहे