Home > News Update > मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली त्यांनी केलेल्या चुकांमुळे :गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली त्यांनी केलेल्या चुकांमुळे :गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली त्यांनी केलेल्या चुकांमुळे :गृहमंत्री अनिल देशमुख
X

सचिन वाझे प्रकरणानंत पोलिसदलात मोठे प्रशासकीय बदल केल्यानंतर यावर प्रथम भाष्य करत "मुंबई पोलिस आयु्क्तांची बदली प्रशासकीय रुटीनचा भाग म्हणून नाही तर त्यांनी केलेल्या चुकांमुळे करण्यात आली, अशी कबुली महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लोकमत ऑफ दि ईअर मध्ये दिली आहे.

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार) सोहळ्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेच्या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केले आहे. मुंबई पोलीस दलाने कोरोना काळात अतिशय उत्तमरित्या काम केले आहे, पोलीस दिवसरात्र मेहनत घेत होते, देशात महाराष्ट्र पोलिसांची चांगली प्रतिमा आहे. काही अधिकाऱ्यांच्या हातून चुका होतात, त्या यापुढे होऊ नये यासाठी काळजी घेतली जाईल असं सांगत त्यांनी सचिन वाझे प्रकरणावर जास्त बोलणं टाळलं. परंतु या प्रकरणामुळे आपण राजीनामा देणार का? या प्रश्नावर त्यांनी थेट नाही असं उत्तर दिलं, माझा राजीनामा घेतला जाणार नाही, घटना घडत राहतात असं देशमुखांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री तुम्हाला रात्री झोपूच देत नाहीत? असा प्रश्न अनिल देशमुख यांना मुलाखतीवेळी विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना गृह खात्याचं कामच तशा पद्धतीचं आहे असे म्हणत उत्तर टाळले. गृहमंत्री हे खातंच असं आहे की, कधी काय घटना घडेल ते सांगता येत नाही. काल रात्रीच आम्ही 1.30 वाजेपर्यंत एकत्र होतो. गृह विभागाला रात्रीचे तीन कधी वाजतात, 4 कधी वाजतात हे कळतही नाही. कारण, रात्री-अपरात्री कधी काय घटना घडतील ते सांगता येत नाही. रात्री 1 वाजता, 2 वाजता कधीही फोन येतो आणि तो फोन घ्यावाच लागतो, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं आमचं सरकार स्थिर आहे, महाविकास आघाडी सरकारचं काम चांगलं आहे, असेही अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं.


Updated : 19 March 2021 3:40 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top