Home > News Update > बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणी नवणीत राणा अडचणीत, कोर्टाने बजावले अजामीनपात्र वॉरंट

बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणी नवणीत राणा अडचणीत, कोर्टाने बजावले अजामीनपात्र वॉरंट

वेगवेगळ्या कारणांमुळे अमरावतीच्या खासदार नवणीत राणा नेहमी चर्चेत असतात. त्यातच बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणी खासदार नवणीत राणा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.

बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणी नवणीत राणा अडचणीत, कोर्टाने बजावले अजामीनपात्र वॉरंट
X

गेल्या काही दिवसांपुर्वी अमरावतीमध्ये लव जिहादचा आरोप करत गोंधळ घातल्यानंतर खासदार नवणीत राणा वादात सापडल्या होत्या. त्यापाठोपाठ बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणी नवणीत राणा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मात्र मुंबई कनिष्ट न्यायदंडाधिकारी न्यायालयाने नवणीत राणा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे.

खासदार नवणीत राणा आणि त्यांचे वडील हरभजनसिंह रामसिंह कुंडलेस यांच्याविरोधात शिवडी महानगर दंडाधिकारी अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.

नवणीत राणा आणि त्यांचे वडील हरभजनसिंह रामसिंह कुंडलेस यांच्याविरोधात मुलूंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र यानंतर 6 सप्टेंबर रोजी राणा यांनी हजेरीतून सुट देण्याबाबत अर्ज केला होता. त्या अर्जाला न्यायालयाने परवानगी दिली होती. मात्र 22 सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीसाठीही खासदार नवणीत राणा आणि त्यांचे वडील उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे खासदार नवणीत राणा आणि त्यांचे वडील हरभजनसिंह रामसिंह कुंडलेस यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. तर महिनाभरात खासदार नवणीत राणा यांच्याविरोधात जारी हे दुसरे वॉरंट जारी करण्यात आले आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

नवणीत राणा ज्या अमरावती लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. तो अमरावती लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गासाठी राखीव होता. त्यानुसार नवणीत राणा यांनी जात प्रमाणपत्र सादर केले. मात्र शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव आडसूळ आणि सुनिल भालेराव यांनी 2017 मध्ये नवणीत राणा यांच्या निवडणूकीला आव्हान देणाऱ्या याचिका दाखल केल्या होत्या. कारण नवणीत राणा यांनी निवडणूक अर्जासोबत दिलेल्या शपथपत्रात अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र दिले होते. मात्र अमरावतीच्या खासदार नवणीत राणा यांचं जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने 21 जून 2021 रोजी रद्द केले आहे. तसेच नवणीत राणा यांना मुंबई उच्च न्यायालयाने 2 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यामुळे नवणीत राणा यांची खासदारकी धोक्यात आली होती. त्यानंतर 22 जून 2021 रोजी नवणीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला स्थगिती दिली.

Updated : 24 Sept 2022 11:22 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top