Home > News Update > कंगनाच्या घरावर पुन्हा बुलडोजर चालणार का?

कंगनाच्या घरावर पुन्हा बुलडोजर चालणार का?

वाचाळ व्यक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री कंगनाची ‘ती’ याचिका न्यायालयाने फेटाळली फेटाळली असून कंगनाने तिच्या घरात केलेले बदल हे आराखड्याच्या विरुद्ध असल्याचे सांगत मुंबई पालिकेच्या कारवाईला स्थगिती देण्यास दिवाणी न्यायालयाने स्पष्ट नकार दिल्याने कंगनाच्या घरावर पुन्हा बुलडोजर चालणार का ?असा प्रश्न निर्माण झाला आहे?

कंगनाच्या घरावर पुन्हा बुलडोजर चालणार का?
X

कोरोना काळात वादग्रस्त वक्तव्य करून भाजपची तळी उचलणारी अभिनेत्री कंगना रनौत पुन्हा अडचणीत आली आहे. कंगनाने तिच्या घरात केलेले बदल हे आराखड्याच्या विरुद्ध असल्याचे सांगत मुंबई दिवाणी न्यायालयाने तिची याचिका फेटाळून लावली आहे. तसेच पालिकेकडून केल्या जाणाऱ्या कारवाईला स्थगिती देण्यासही न्यायालयाने नकार दिला.

न्यायालयाने कंगनाने खार इथल्या तिच्या घरात बेकायदेशीर बांधकाम केल्याचा ठपका ठेवत पालिका हे बांधकाम तोडू शकते असा निकाल दिला होता. या निकालाला कंगनाने आव्हान देत पालिकेला कारवाई करण्यापासून थांबवण्याची मागणी केली होती. कंगनाची हीच मागणी मुंबईतील दिवाणी न्यायलयाने फेटाळली आहे. त्यामुळे कंगनाच्या अडचणींत वाढ झाली आहे. आता कंगनाच्या घराला बुलडोजर कधी लावायचा याचा निर्णय महानगरपालिका ला घ्यायचा आहे.

खार पश्चिममधील डी. बी. ब्रिझ इमारतीत कंगनाने एकाच माळ्यावरील 3 फ्लॅट एकत्र केले आहेत. या बांधकामात तिने मंजूर आराखड्याव्यतिरिक्त वाढीव जागा अतिक्रमित केल्याचा आरोप पालिकेने केला केलेला आहे. याविरोधात पालिकेने कंगनाला नोटीस पाठवली होती. त्यानंतर हा खटल्यावर दिंडोशी न्यायालयात युक्तीवाद करण्यात आला. त्यानंर न्यायालयाने या खटल्यामध्ये कंगनाने तिच्या घरात अनधिकृत बांधकाम केल्याचं न्यायालयाने म्हटलं होतं.

तसेच, न्यायालयाने या निर्णयाला आव्हान देण्यासाठी कंगनाला 6 आठवड्यांची मुदत दिली आहे. सहा आठवड्यांच्या आत कंगनाने उच्च न्यायालयात आव्हान दिले नाही, तर कंगनने केलेल्या अनधिकृत बांधकामाला पाडण्यास न्यायालयाने मुभा दिली होती.

कंगनाने केलेल्या अनधिकृत बांधकामाविरोधात तिला 2018 साली नोटीस देण्यात आली होती.नोटिशीत उल्लंघनाचा स्पष्ट उल्लेख नाही असा कंगनाच्या वकिलांचा युक्तिवाद होता.

दरम्यान, कंगनाने पालिकेच्या नोटिशीविरोधात मुंबई दिवाणी न्यायालयात धाव घेतली होती. यावेळी तिने पालिकेनं पाठवलेल्या नोटिशीत उल्लंघन केलेल्या नियमांचा स्पष्टपणे उल्लेख केलेला नसल्याचा युक्तिवाद केला.

कंगनाची बाजून अ‌ॅड. रिजवान सिद्दीकी यांनी मांडली. त्यांचा हा युक्तीवाद अ‌ॅ़ड. धर्मेश व्यास यांनी खोडून काढला. धर्मेश मुंबई महापालिकेची बाजू मांडत आहेत. मुंबई महापालिकेच्या अभियंत्याने अभिनेत्री कंगना रनौतच्या घराचं सर्वेक्षण केलेलं आहे. त्यानंतर कंगनाने ज्या 8 नियमांचे उल्लंघन केलेले आहे, त्याचा स्पष्टपणे उल्लेख केलेला असल्याचं व्यास यांनी म्हटलं. त्यांतनर मुंबई दिवाणी न्यायालयाने कंगनाची याचिका फेटाळून लावली.

Updated : 2 Jan 2021 9:15 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top