Home > News Update > महापालिकेची मोठी कारवाई, रिलांयसकडून वसूल केले 39 कोटी

महापालिकेची मोठी कारवाई, रिलांयसकडून वसूल केले 39 कोटी

मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेद्वारे कारवायांचा धडाका, कुठे अलिशान वाहनांची जप्ती, तर कुठे तोडला पाणीपुरवठा पाहा किती कोटी झाले जमा…

महापालिकेची मोठी कारवाई, रिलांयसकडून वसूल केले 39 कोटी
X

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी जर कर भरलेला नसेल तर त्यांच्याविरुद्ध महापालिकेने कारवाई करण्याचा धडाका सुरु केला आहे. 'मालमत्ता कर' नागरिकांनी वेळेत महापालिकेकडे जमा करावा यासाठी महापालिकेने कारवायांचा धडाका सुरू केला आहे. अतिरिक्त महापालिका आयुक्त पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनात सुरू असलेल्या या धडक कारवाई मोहिमेंतर्गत अंतर्गत मालमत्ता कर थकबाकीपोटी आतापर्यंत अनेक ठिकाणी अलिशान वाहनांची जप्ती करण्यात आली आहे. तर काही ठिकाणी जल-जोडणी खंडित करण्यात आली. ज्यानंतर अनेक प्रकरणी संबंधितांद्वारे मालमत्ता कर रकमेचा भरणा महापालिकेकडे करण्यात आल्यानंतर पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.

महापालिकेने यामध्ये रिलांयसला देखील सोडलेले नाही. महापालिकेने रिलांयसकडून 39 कोटींचा मालमत्ता कर वसूल केला आहे. मार्च एन्ड असल्यानं आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये रुपये ५ हजार २०० कोटी मालमत्ता कर जमा करण्याचे लक्ष्य महापालिकेसमोर आहे. आज पर्यंत रुपये ३ हजार ६५० कोटी एवढा मालमत्ता कर जमा झाला आहे. या नुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात करण्यात आलेल्या कारवायांपैकी ५ कारवाया...

१) 'एच पूर्व' विभागाच्या हद्दीतील पक्षकार मे. भारत डायमंड बोर्स यांच्या प्रतिदानाच्या विवादा प्रकरणी तोडगा काढून रु. २५.८६ कोटी इतकी मालमता कर वसूली करण्यात आली. तसेच 'मे. रिलायन्स इंडस्ट्रिज लि.' यांच्या विवीध मालमतांच्या भांडवली मूल्याविरोधातील प्रलंबित तकारी प्रकरणातून पक्षकाराकडून रु. ३९ कोटी इतक्या मालमता कराच्या रक्कमेची वसूली करण्यात आली.

2) 'एम पश्चिम' विभाग कार्यक्षेत्रातील मे. चंदुलाल पी.लोहना (विकासक मे. जय कन्स्ट्रक्शन) यांची मालमत्ता कराची रुपये ३८ लाख ८० हजार ७०५ इतकी थकबाकी असल्यामुळे त्यांच्या मालकीची 'बी एम डब्लू कार' जप्त करण्यात आली. त्यानंतर संबंधितांंद्वारे रुपये १९ लाख इतकी रक्कम जमा करुन गाडी सोडवून नेण्यात आली.

3). एम पश्चिम विभाग कार्यक्षेत्रातील मे. युनीटी लॅण्ड कन्सल्टन्सी यांची मालमत्ता कराची रुपये १ कोटी १० लाख २२ हजार २४० इतकी थकबाकी असल्यामुळे त्यांच्या मालकीची 'ब्रीझा कार' जप्त करण्यात आली. तसेच त्यांच्या बांधकामाच्या जागेवरील ऑफिस 'सिल' केले आणि बांधकाम कार्य बंद करण्यात आले.

4) 'के पूर्व' विभाग हद्दीतील अंधेरी असणाऱ्या 'सोलिटेयर कॉर्पोरेट पार्क' व 'वरटेक्स बिल्डिंग' यांच्या जलजोडण्या खंडित करण्यात आल्या. तसेच मलवाहिनीही थोपवण्यात आली. या कारवाईनंतर मालमत्ता धारकांनी थकीत रकमेच्या ५०% रक्कम, अर्थात अनुक्रमे रक्कम रुपये ९.६० कोटी व ३१ लाख रुपये भरण्यात आले.

५) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'एम पश्चिम' विभाग कार्यक्षेत्राच्या हद्दीतील 'आय मॅक्स थिएटर' ची मालमत्ता कराची थकबाकी ही रुपये ७५ लाख इतकी झाली असल्यामुळे संबंधित मालमत्तेची जलजोडणी खंडित करण्यात आली आहे.

Updated : 14 March 2021 8:28 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top