Home > News Update > Winter थंडीची हूडहुडी वाढली; मुंबईसह महाराष्ट्राला थंडीचा तडाखा

Winter थंडीची हूडहुडी वाढली; मुंबईसह महाराष्ट्राला थंडीचा तडाखा

Winter थंडीची हूडहुडी वाढली; मुंबईसह महाराष्ट्राला थंडीचा तडाखा
X

महाराष्ट्रात (Maharashtra) अनेक ठिकाणी हवामान तापमानाचा (temperature)पारा वर-खाली होताना दिसतोय. हवामान खात्याने (IMD) येत्या ४८ तासात थंडीचे प्रमाण वाढण्याची माहिती दिली आहे. त्यामुळे तापमानाचा पारा पुन्हा घसरण्याची शक्यता आहे.

काश्मीर पासून ते अगदी मध्यप्रदेश पर्यंत आणि देशाच्या उत्तरेकडील (north india) भागात हवामान बदलन्याचे प्रचंड प्रमाण जाणवू लागले आहे. उत्तरेकडील थंडीचा कहर जास्त प्रमाणात झाल्याने दिल्ली मधील शाळेला सुट्टी देण्यात आली आहे. तसचं राज्यातील अनेक जिल्ह्यात हवामानाचा पारा तीव्र झाल्याने थंडीची हूडहुडी वाढली आहे. मराठवाड्यातील आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये थंडीच्या वाढत्या लाटेचा इशारा देण्यात आलं आहे.

भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेचे उपमहाप्रबंधक कृष्णानंद होसाळकर यांनी ट्विट करुन सांगितले, या थंडीचा लाट राज्यातील अनेक जिल्ह्यांना बसणार आहे.

रात्रीचे तापमान मैदानी प्रदेशात किमान १० अंशांखाली आणि एकूण सरासरीच्या तुलनेत ४.५ अंशांपेक्षा कमी झाल्यास ती थंडीची लाट आहे असे समजले जाते. त्यामुळे राज्यातील नागरिकांना आरोग्याची (Health) काळजी घेणे फार महत्वाचे आहे. संपूर्ण महाराष्ट्रात सध्या किमान तापमानात सरासरी पेक्षा ४ डिग्री तर कमाल तापमानातही २ डिग्रीने घसरण होऊन चांगलाच थंडीचा तडाका बसला आहे. येत्या १५ जानेवारीला आणि त्यानंतर काही दिवस थंडीचा प्रभाव जाणवू शकतो. त्याच बरोबर मुंबईसह कोकणातही ऊबदार पण कमी होऊन किमान तापमानात सरासरीपेक्षा १-२ डिग्रीने घसरण होवून थंडी जाणवू शकते.

त्या बरोबरच महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक जिल्यात तसेच अहमदनगर, औरंगाबाद जिल्ह्याच्या काही भागात मोजक्या ठिकाणी उद्या दि. ११ जानेवारीपासुन काहीशी थंडीची लाट जाणवेल. दक्षिणेकडील तामिळनाडू, पॉंडिचेरी व कराइकल, केरळ व माही, तसेच सीमांध्र व येनाम, रायलसीमा, दक्षिण कर्नाटकचा अंतर्गत भागात २८ ऑक्टोबरला आगमन झालेला ईशान्य (हिवाळी) मान्सून परवा गुरुवार दि.१२ जानेवारीपासून समाप्तीच्या मार्गांवर आहे.

अशा जोरदार थंडीच्या तडाक्याने नागरिकांना अंगावर स्केटर किंवा गरम कपडे घातल्याशिवाय बाहेर पडणे कठीण होत आहे. या दिवसात राज्यातील नागरिकांना आरोग्याची (Health) काळजी घेणे गरजेचे आहे, असे निवृत्त हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.

Updated : 10 Jan 2023 8:37 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top