मुंबई विमानतळावरील अदानींचा बोर्ड शिवसैनिकांनी फोडला
X
मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या व्यवस्थापनाचं कामकाज अदानी समुहाने 13 जुलैला ताब्यात घेतलं. हा ताबा घेतल्यानंतर या ठिकाणी काही लोक गुजराती लोकप्रिय नृत्य गरबा करत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
मात्र, आता मुंबई विमानतळाचा ताबा घेतलेल्या अदानी समुहाने विमानतळावर आणि बाहेरच्या दोन्ही ठिकाणी 'अदानी विमानतळ' असे नामफलक लावले होते.
यावर संतप्त झालेल्या शिवसेनेने विमानतळाबाहेर लावलेल्या नामफलकाची तोडफोड करून तो हटवला आहे. या अगोदर या विमानतळाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी
जीव्हीके कंपनीकडे होते. मात्र, त्यानंतर ही जबाबदारी अदानी समूहाकडे आली. आणि अदानी समुहाने या ठिकाणी नामफलक लावले. हे नामफलक शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांनी काढून टाकले आहेत. या कामगारांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला अदानीचं नाव देऊ नये. अशी मागणी केली आहे.
दरम्यान या ठिकाणी मोठा पोलिस फाटा तैनात करण्यात आला आहे.