Home > Election 2020 > शिवसेनेच्या उमेदवारासाठी मनसे ची माघार

शिवसेनेच्या उमेदवारासाठी मनसे ची माघार

शिवसेनेच्या उमेदवारासाठी मनसे ची माघार
X

मनसेच्या स्थापने पासून शिवसेना आणि मनसेचं विळ्या भोपळ्याचं नात राहिलेलं आहे. मात्र, या विधानसभेच्या निवडणुकीत निवडणुका जाहीर झाल्या तरी मनसेचे नेते अजुनही सक्रीय झालेले दिसून येत नाही.

त्यातच आता आंबेगाव मतदार संघातील मनसेच्या उमेदवाराने माघार घेत शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यानं शिवसेनेच्या मनसेला मोठा झटका बसला आहे.

आंबेगाव विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधातील शिवसेना पक्षाचे उमेदवार राजाराम बाणखेले यांना पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार वैभव बाणखेले यांनी विधानसभा निवडणुकीतुन माघार घेतली.

त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवारासाठी मनसेने घेतलेली माघार चर्चेचा विषय ठरला आहे. आंबेगाव विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी कॉग्रेस साठी जड जाणार नाही अशी स्थिती असताना शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी डाव टाकत मनसेच्या उमेदवाराचा पाठिंबा मिळवला आहे. त्यामुळे निवडणूक रंगतदार होईल असं चित्र निर्माण झाले आहे.

या माघारीबाबत मनसेचे उमेदवार वैभव बाणखेले यांच्याशी संपर्क साधला असता शिवसेनेचे उमेदवार राजाराम बाणखेले माझे भाऊबंध असल्याने मी माघार घेतली आहे. ठाकरे घराण्याने वरळी विधानसभेत ज्याप्रमाणे भाऊंबधकी जपली त्याप्रमाने मी ही भाऊबंधकी जपली आहे. असं वैभव बाणखेले यांनी सांगितले.

Updated : 8 Oct 2019 4:59 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top