अखेर MPSC प्रकरणात Max Maharashtra च्या पाठपुराव्याला यश...
X
महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी MPSC परीक्षेसाठी नवीन निकष लागू केल्यानंतर त्याचे राज्यभरात आंदोलन झालं, अखेर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हस्तक्षेप करत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी चर्चा केल्यानं यातून तोडगा निघणार आहे.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांनी सरकारच्या विरोधात राज्यभरात मोर्चाचे आयोजन केले होते. आयोगाने लागू केलेले नवीन परीक्षा निकष तात्काळ स्थगित करून ते 2025 पासून लागू करावे ही विद्यार्थ्यांची आग्रही मागणी होती. अचानक लागू केलेल्या नवीन निकषांमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होऊ शकतो? नवीन निकषानुसार वस्तुनिष्ठ परीक्षेच्या आयोज विद्यार्थ्यांना वर्णनात्मक परीक्षा द्यावी लागणार आहे यासाठी असलेली पूर्वतयारी झाली नसल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून असंख्य विद्यार्थी पुणे शहरात येतात प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा ते शिक्षण घेतात अचानक लागू झालेल्या नियमामुळे मानसिकतेवर परिणाम होत असल्याचा विद्यार्थ्यांनी सांगितलं
यासाठी सरकारच्या विरोधात विद्यार्थी आक्रमक झाले होते जबाबदार माध्यम म्हणून Max Maharashtra ने विद्यार्थ्यांचा आवाज बुलंद करत तो सरकारपर्यंत पोहोचवला. यानंतर विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे, राष्ट्रवादी नेते अंकुश अण्णा काकडे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी विद्यार्थ्यांनी चर्चा केली. या चर्चेदरम्यान आमचे प्रतिनिधी गौरव मालक यांनी सहभाग नोंदवून दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान येणाऱ्या अडचणी यासह विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर चर्चा केली.
शरद पवार यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करून संबंधित प्रकरणात लक्ष देण्याची मागणी केली एकनाथ शिंदे यांनी लवकरच या संदर्भात विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला भेटून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन दिलं. जोपर्यंत विद्यार्थ्यांना योग्य न्याय मिळत नाही तोपर्यंत Max Maharashtra विद्यार्थ्यांसोबत असणार आहे.