खासदार उदयनराजे भाेसले यांनी जिल्हा बॅंकेला दिली भेट
X
सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीशी माझा काही संबंध नाही पण बँकेची निवडणूक लावून खर्च करण्यापेक्षा निवडणुकीचा पैसे सभासदांसाठी वापरला तर सभासदांचा फायदा होईल असे मत खासदार उदयनराजे भाेसले यांनी व्यक्त केले.
आज (शुक्रवार) दुपारी एक वाजता जिल्हा बॅंकेची सर्वसाधारण सभा होती. त्या अनुषंगाने खासदार उदयनराजे भाेसले बॅंकेत आले. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणुक आगामी काळात हाेणार आहे.
आज (शुक्रवारी) कार्यकारिणीची अंतिम सर्व साधारण सभा घेण्यात आली. या सभेपुर्वी खासदार उदयनराजे बॅंकेत दाखल झालेत. त्यांनी बॅंकेच्या कामकाजावर समाधान व्यक्त केले. दरम्यान जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकीशी माझा काही संबंध नाही पण बँकेची निवडणूक लावून खर्च करण्यापेक्षा निवडणुकीचा पैसे सभासदांसाठी वापरले तर सभासदांचा फायदा होईल असेही खासदार उदयनराजे भाेसले यांनी नमूद केले. बँक व्यवस्थित चालली असताना ईडीची नोटीस का ? असा प्रश्न खासदार उदयनराजे भाेसले यांनी उपस्थित केला आहे.
खर तर या नोटीसीचे पुढे काहीच झाले नाही, बॅंकेचा सर्व व्यवहार व्यवस्थित सुरू आहे असं मला वाटत, दरम्यान बँक सर्वसामान्य लोकांच्या ताब्यात राहावी अशी नागरिकांची इच्छा आहे असा प्रश्न विचारला असता बँक सर्वसामान्य नागरिकांचीच आहे असे उत्तर खासदार भोसले यांनी दिले.
सोबतच मी बँकेत अगदी सहजच आलो मला काही बँकेतून कर्ज वगैरे काढायचे नाही असं त्यांनी आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये सांगितले.