Home > News Update > 'केवळ अश्रू ढाळू नका...काय पावलं उचलणार ते सांगा!' ; खासदार संजय राऊत यांचा केंद्र व राज्य सरकारला सवाल

'केवळ अश्रू ढाळू नका...काय पावलं उचलणार ते सांगा!' ; खासदार संजय राऊत यांचा केंद्र व राज्य सरकारला सवाल

केवळ अश्रू ढाळू नका...काय पावलं उचलणार ते सांगा! ; खासदार संजय राऊत यांचा केंद्र व राज्य सरकारला सवाल
X

मुंबई : अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एकीकडे राज्यात दिवाळी साजरी होत असतानाच दुसरीकडे अहमदनगरच्या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे. याच घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर तोफ डागली आहे. आता घटना घडल्यानंतर केवळ अश्रू ढाळू नका तर असे प्रकार पुन्हा घडू नयेत म्हणून कोणती पावलं उचलणार ते सांगा, असा प्रश्न राऊतांनी दोन्ही सरकारांना विचारला आहे.

अहमदनगरच्या आगीच्या दुर्घटनेत 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यासाठी निमित्त शॉर्टसर्किट ठरले असले तरी आरोग्य व्यवस्थेची ही होरपळ आता तरी थांबायला हवी. असं राऊत यांनी म्हटले आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्था ही केंद्र आणि राज्य सरकारची जबाबदारी आहे. सध्या मरण स्वस्त झाले हे मान्य, पण ते इतके अमानुष व क्रूर असावे? सरकारने आता फक्त अश्रू ढाळू नये. हे पुन्हा घडू नये यासाठी काय ठोस पावले उचलणार ते फक्त सांगा, असा सवाल राऊत यांनी विचारला आहे.

Updated : 8 Nov 2021 9:14 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top