Video: राजे शांत का? खासदार छत्रपती संभाजीराजे म्हणाले?
X
मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी कोरोना काळात आपली भूमिका मवाळ घेतल्याची टीका काही लोकांनी केल्यानंतर आज संभाजीराजे स्वत: माध्यमांसमोर आले. आणि आपली भूमिका मांडली.
कोणाचा जीव गेला तर जबाबदार कोण?
आक्रमक व्हायला दोन मिनिटं लागतात. आंदोलनाला काय लागतं, आता लगेच करु. पण त्यामध्ये कोणी मयत झाले तर त्याला जबाबदार कोण, शाहुंचा वंशज, असा सवाल संभाजीराजे यांनी उपस्थित केला. मी मराठा आरक्षणासाठी माझा महाल सोडून राज्य पिंजून काढत आहे. ही वेळ आक्रमक होण्याची नाही. प्लेगच्या साथीच्यावेळीही राजर्षी शाहू महाराजांनी असाच संयम दाखवला होता.
पुढील काळात आपण महाराष्ट्राचा दौरा करणार असून लोकांच्या भावना जाणून घेणार आहेत. या काळात मराठा समाजातील जाणकार, विद्वान आणि वकिलांशी चर्चा करूनच मुख्यमंत्र्यांची आणि विरोधी पक्ष नेत्यांची 27 मेला भेट घेणार आहे. त्यानंतर आपण आपली भूमिका माध्यमांसमोर मांडणार असल्याचं मत आज संभाजीराजे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं आहे