खासदार राजेंद्र गावित यांच्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार
X
खासदार राजेंद्र गावित यांच्यावर एका महिलेने विनयभंगाचा आरोप केलेला आहे, तसेच त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार केलेली आहे. राजेंद्र गावित यांच्या मीरा रोड येथील गॅस एजन्सीमध्ये ही महिला काम करत होती. पण या एजन्सीमध्ये सुमारे एक कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप राजेंद्र गावित यांनी केलेला आहे आणि या घोटाळ्यामध्ये संबंधित महिला सहभागी असल्याचाही आरोप त्यांनी केलेला आहे.
राजेंद्र गावित यांनी या संदर्भात एक निवेदन प्रसिद्ध केले आहे त्यानुसार, गेल्या काही वर्षांपासून मीरा रोड येथील भारत गॅस एजन्सी मध्ये (२०१५ ते २०२० पर्यंत) मॅनेजर हृदय किणी, कॉम्प्युटर ऑपरेटर प्रभाकर कारभारी व बुकिंग क्लार्क देवी बंगाली तीन या व्यक्ती त्यांच्या गॅस एजन्सीमध्ये करीत होत्या. पण त्यांनी साधारणपणे १ कोटीच्या वरती घोटाळा केल्याचा आरोप गावित यांनी केला आहे.
यानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर तिघांनाही न्यायालयाने ६ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. ६ दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर करून मुक्तता केली. या तिघांपैकी देवी बंगाली या महिलेने या कारवाईचा राग मनात धरुन केवळ सूडबुद्धीने आपल्यावर विनयभंगाची खोटी तक्रार दाखल केली आहे. असे राजेंद्र गावित यांनी म्हटलेले आहे.