अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची खासदार प्रितम मुंडेकडून पाहणी
X
बीड : बीड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले असुन अनेक ठिकाणचे पाझर तलाव ही फुटले आहेत.गेवराई तालुक्यातील नुकसान झालेल्या पिकांची व फुटलेल्या तलावांचा पाहणी दौरा खासदार प्रितम मुंडे यांनी केला.
दरम्यान अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई व पीक विमा लवकर मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगत शेतकऱ्यांना ताबडतोब मदत करत नसल्याने मी राज्य सरकारचा निषेध करते असं खासदार मुंडे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
अतिवृष्टीने नुकसान झाल्याने शेतकरी अगोदरच हवालदिल झालेला आहे , शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आता फक्त पीक विमा व नुकसान भरपाई हाच पर्याय उरलेला आहे. मात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई, पीक विमा लवकर मिळणे अपेक्षित असताना मात्र राजकीय नेते व मंत्री पाहणी दौऱ्यात व्यस्त असल्याचे दिसून येते आता पाहणी दौरे बंद करून झालेल्या नुकसानीची भरपाई व विमा लवकर देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.