Home > News Update > Shivsena खासदार भावना गवळी पुन्हा ED च्या रडारवर

Shivsena खासदार भावना गवळी पुन्हा ED च्या रडारवर

महाविकास आघाडीच्या नेत्यांमागे लागलेला केंद्रीय तपास संस्थांचा ससेमिरा थांबायला तयार नाही. शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानमधील (Mahila Utkarsh Pratishthan) मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी भावना त्यांना ईडीकडून (ed) समन्स बजावण्यात आलं आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांमागे लागलेला केंद्रीय तपास संस्थांचा ससेमिरा थांबायला तयार नाही. शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानमधील (Mahila Utkarsh Pratishthan) मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी भावना त्यांना ईडीकडून (ed) समन्स बजावण्यात आलं आहे.

यवतमाळच्या शिवसेना खासदार भावना गवळी (Bhavana Gawali)गेल्या अनेक दिवसांपासून ईडीच्या रडारवर आहेत.गवळी यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

पुढील आठवड्यात चौकशीसाठी हजर राहण्याचा आदेश या समन्समधून देण्यात आला आहे. चौकशीसाठी हजर न झाल्यास ईडी अजामिनपात्र वॉरंट काढण्याची शक्यता असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. हरीश सारडा यांनी यांनी भावना गवळींची ईडीकडे तक्रार केली आहे.

सारडा यांनी केलेल्या तक्रारीनंतर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी वाशीमला येऊन पत्रकार परिषद घेतली होती. त्यांच्याविरोधात 100 एकर जमीन असलेल्या बालाजी पार्टीकल बोर्डाच्या सहकारी कारखान्याबाबतच्या एकूण खरेदी-विक्री व्यवहाराबाबत तक्रार करण्यात आली होती.

गेले काही दिवस महा विकास आघाडीच्या नेत्यांमध्ये केंद्रीय तपास संस्थांचा ससेमिरा सुरू झाला आहे. काल रात्री शिवसेना खासदार राहुल शेवाळेंवर बलात्काराचा आरोप करण्यात आला असून पोलिसांत लेखी तक्रार दाखल झाली आहे.

सप्टेंबर महिन्यात 'ईडी'ने भावना गवळी यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले होते. या प्रकरणात ईडीनं सईद खान या व्यक्तीला अटक केली होती. सईद खान हे खासदार गवळी यांच्या ट्रस्टमध्ये संचालक आहेत. या ट्रस्टला बेकायदेशीररित्या कंपनीमध्ये रुपांतरित करण्यासाठी सईद खान यांनी मध्यस्थी केली. त्यासाठीच धर्मदाय आयुक्त कार्यालयातही गैरयव्यवहार झाला.ह एकूण गैरव्यवहार १८ कोटींचा आहे. यात सात कोटी रुपयांच्या रोख रकमेचाही गैरवापर करण्यात आल्याची माहिती ईडीला मिळाली आहे. त्यासंबंधी अधिक चौकशीसाठीच गवळी यांना तीनवेळा समन्स बजावण्यात आले होते.

ईडीच्या या कारवाईवर गवळी म्हणाल्या होत्या की,भाजपनं जुलमी सत्र सुरू केलं आहे. माझी आणि माझ्या संस्थांची काय चौकशी करायची ती करा. पण शिवसेना हा अन्यायाविरुद्ध लढणारा पक्ष आहे. आम्ही लढल्याशिवाय राहणार नाही, माझी चौकशी करताय तर वाशिम जिल्ह्यातील भाजपच्या आमदारांची पण चौकशी करा अशी त्यांनी मागणी केली होती.

Updated : 29 April 2022 10:34 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top