Home > News Update > 25 कोटी 36 लाख रुपये थकीत वेतनासाठी कामगारांचे आंदोलन

25 कोटी 36 लाख रुपये थकीत वेतनासाठी कामगारांचे आंदोलन

भाजप खासदार डॉ. सुजय विखे यांनी राहुरी येथील साखर कारखान्याचा केवळ सत्ता मिळवण्यासाठी वापर केल्याचा आरोप करत शिवसेना , आरपीआयने कामगारांच्या आंदोलनाला पाठींबा दिला आहे.

25 कोटी 36 लाख रुपये थकीत वेतनासाठी कामगारांचे आंदोलन
X

अहमदनगरच्या राहुरी तालुक्यातील डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी थकीत वेतनासाठी कारखाना परिसरात उपोषण सुरू केले असून, कामगारांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

दरम्यान कामगारांनी सुरू केलेल्या या आंदोलनाला शिवसेना आणि आरपीआयने पाठींबा दर्शवत आज राहुरी कारखाना परिसरात नगर-मनमाड महामार्गावर रास्ता-रोको आंदोलन केले आहे. डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्यावर भाजप खासदार डॉ. सुजय विखे यांची सत्ता आहे, मात्र त्यांनी केवळ खासदारकी मिळवण्यासाठीच हा कारखाना सुरू केला मात्र, सत्ता मिळाल्यानंतर कारखान्याकडे दुर्लक्ष केले असा आरोप आरपीआयचे सुरेंद्र थोरात यांनी केला.

डॉ. सुजय विखे व संचालक मंडळाच्या कार्यकाळातील सेवेत असणारे, सेवानिवृत्त, हंगामी आणि मजूर यांचे तब्बल 25 कोटी 36 लाख रुपये वेतन थकले आहे. ही रक्कम तातडीने द्यावी अन्यथा सर्व कामगार मिळून आत्मदहन करू असा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान या आंदोलकांची काल खासदार डॉ सुजय विखे यांनी भेट घेतली मात्र, कामगार आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.

Updated : 30 Aug 2021 4:17 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top