150 लोकांचा बळी घेणाऱ्या गुजरात मधील मोरबी दुर्घटनेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी…
X
गुजरातमधील मच्छू नदीवरील मोरबी पूल दुर्घटना प्रकरनी जनहित याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या अपघाताची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली चौकशी व्हावी. अशी जनहित याचिका विशाल तिवारी यांनी दाखल केली आहे.
गुजरातमधील मच्छू नदीवरील जुना असलेला पूलाची डागडुजी करून पर्यटकांसाठी खुणा करण्यात आला होता. झुलता पूल असल्याने नियमानुसार 100 लोकांना ये जा करण्याची परवानगी असतांना 400 ते 500 लोक एकाच वेळी या पुलावर चढल्याने कोसलळा यात १५० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. यानिमित्ताने प्रशासनाच्या अक्षम्य चुका समोर आल्या. यावरून देशाचं वातावरणही ढवळून निघालं होत.
सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेत अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी देशभरातील सर्व जुन्या पूल किंवा स्मारकांवर गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी नियम बनवण्याची मागणी करण्यात आली आहे. यासोबतच जुन्या पुलांच्या सर्वेक्षणासाठी राज्य सरकारांना समिती स्थापन करण्याचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे.