उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोहित पवारांना झापलं
X
आजपासून विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याची सुरुवात झाली. त्या आधीच कर्जत-जामखेड मतदारसंघाचे राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांनी विधीमंडळाबाहेरील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ एकटे उभे राहत MIDC च्या मुद्यावर आंदोलन केलं आहे. याची दखल अधिवेशनात घेण्यात आली. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार रोहित पवार यांना चांगलंच झापलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की "अहवालाची प्रत माझ्याकडे पण आहे आणि त्यांनी मंत्री उदय सामंत यांना पण दिलेली होती. पाटेगाव, खंडाळा, कर्जत, अहमदनगर येथे औद्योगिक वसाहत जाहीर करण्यासंदर्भात पत्र विभागास प्राप्त झाले आहे. तरीही या विषयासंदर्भात हे अधिवेशन संपण्याच्या आत सर्व संबंधितांची बैठक घेऊन उचित निर्णय घेण्यात येईल. तरी आमदार रोहित पवार यांनी उपोषणाचा निर्णय मागे घ्यावा, असं उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.
ते पुढे म्हणाले की स्वतः मंत्री महोदय पत्र देतात. अजून अधिवेशन संपलेलं नाही. अधिवेशनाला एकच आठवडा झालेला आहे. आता दुसरा आठवडा सुरू झालाय. लोकप्रतिनिधींनी पण निवेदन दिल्यानंतर त्या MIDC चे चेअरमन आणि राज्याचे उद्योगमंत्री यांनी पत्र दिल्यानंतर त्याची गंभीरतेनं नोंद घ्यायला पाहिजे. अशा पद्धतीनं उपोषणाला बसणं उचित नसल्याचं सांगत अजित पवार यांनी आमदार रोहित पवारांना झापले.