मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यातून परतण्याची शक्यता
X
यंदा राज्यासह देशाला मुसळधार पावसाने चांगलच झोडपून काढलं. कुठे अतिवृष्टी झाली. तर कुठे सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला आहे. तर कुठे समाधानकारक सरी बरसल्या आहेत. राज्यात मात्र यंदा सगळीकडे सरासरी पेक्षा अधिक पाऊस पडला आहे. मुंबई आणि नजिकच्या जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय. आता मात्र हा मान्सून आपला परतीचा प्रवास सुरू कऱणार आहे. केरळ मधून देशात शिरलेल्या मान्सुनचा परतीचा प्रवास हा राजस्थानमधून सुरू असणार आहे असा अंदाज भारतीय हवामान विभागाने मंगळवारी २० सप्टेंबरला व्यक्त केला आहे. यंदा संपुर्ण देशात सरासरीपेक्षा ७ टक्के अधिक तर राज्यामध्य़े तब्ब्ल २६ टक्के अधिक पाऊस पडला आहे.
राजस्थानमधुन परतीचा प्रवास सुरू
साधारणता दरवर्षी मान्सूनचा परतीचा प्रवास हा १७ सप्टेंबर पासून सुरू होतो. त्यामानाने यंदा मान्सून ने त्याचा परतीचा प्रवास दोन ते दिवस उशीराने सुरू केला आहे. राजस्थान मधून मान्सून परतायला सुरूवात झाल्यानंतर तो राज्यातून परतायला १५ ते २० दिवसांनी सुरू होतो. त्याअर्थी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यातून मान्सून त्याचा परतीचा प्रवास सुरू करणार आहे. पण मागील वर्षीपेक्षा यंदा मान्सून जवळपास १५ ते १६ दिवस आधीच परतणार आहे. मागील वर्षी १५ ऑक्टोबरला मान्सूनने राज्यातून माघार घेतली होती.
परतीचा मान्सून झोडपणार
मान्सून परतू लागला की पश्चिमेकडील वारे हे पुर्वेकडे म्हणजेच बंगालच्या उपसागराच्या दिशेने वाहू लागतात. त्यामुळे तिथे कमी दाबाचा पट्टा तयार होतो या कारणास्तव राज्यात मराठवाडा, मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भात पुढील काही दिवसात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.