जळगांव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट हवामान खात्याचा एलो अलर्ट
संतोष सोनवणे | 4 Jun 2023 6:20 PM IST
X
X
मान्सूनच आगमन अंदमान निकोबार आणि केरळ पर्यंत पोहचले आहे अजून महाराष्ट्रात पोहचण्यास वेळ असला तरी राज्यातील काही भागात आज दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला जळगांव जिल्ह्यात दुपारी अचानक वातावरण बदलल्याने सुरवातीला जोरदार वाऱ्यासह ढगांचा कडकडात आणि त्यानंतर जोरदार पाऊस झाला यामुळे शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांची तारांबळ उडाली अनेक भागात वाऱ्यामुळे झाडं जमीनदोस्त झाली.अनेक वाहनांवर झाडं पडली आहेत. शेतीचेही नुकसान झालं.काही भागात केळीच्या बागांचही नुकसान झालं आहे.खांदेशात मोठ्या प्रमाणात उन्हाळी कापूस लागवड केली जाते. या अवेळी पडलेल्या पाऊसाचा उन्हाळी कापसाला फायदा होणार आहे.
Updated : 4 Jun 2023 6:20 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire