बालाजी ला नारळ चढवा !!
X
कोरोनाने आत्तापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. लोक रस्त्यावर मरुन पडत आहेत. अशा परिस्थितीत लोक नेत्यांकडे ऑक्सिजन, औषधं यासाठी मदत मागत आहे.
जोधपुर चे खासदार आणि केंद्रीय जल शक्ति मंत्री गजेंद्र शेखावत यांना कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांनी मदत मागितली असता, बालाजीला नारळ चढवण्याचा सल्ला दिला.
त्याचं झालं असं की सोमवारी मंत्री शेखावत जोधपुर येथे रुग्णालयाची व्यवस्था पाहण्यासाठी गेले होते. MDM रुग्णालयातील एका रुग्णांच्या नातेवाईक महिलेने या दरम्यान मंत्र्यांना मदत मागितली. यावर शेखावत यांनी तिला मदत करण्याऐवजी, 'डॉक्टर आपले काम करत आहेत. तुम्ही बालाजी महाराजांना एक नारळ चढवा... परमेश्वर सगळं ठीक करेल'
असं म्हणत पुढे निघून गेले.
दरम्यान या त्यांच्या विधानावर टीका झाल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले डॉक्टर त्यांचं काम करत आहेत. मी पूर्ण रुग्णालय पाहिलं मी, त्या महिलेला धीर देत होतो. देवावर आस्था ठेवणं काही वाईट आहे का? एखाद्या व्यक्तीला दिलासा देण्यासाठी आपण असं बोलत असतो. बालाजी देवावर विश्वास ठेवा असं म्हणणं वाईट का? आपण घरातील व्यक्तीच्या चांगल्या आरोग्यासाठी नारळ चढवतोच ना? ही साधी बाब आहे.
असं म्हणत मंत्री महोदयांनी यावर आपलं स्पष्टीकरण दिलं आहे.