मोदींचा पुन्हा यू-टर्न
X
मला करुणा नियंत्रणासाठी फक्त 21 दिवस द्या अशी भीमगर्जना करणारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना संकटात वारंवार यु टर्न घेतल्याचे स्पष्ट झाले आहे
नोटबंदी आणि जीएसटी प्रमाणेच कोरोना संकटातही केंद्र सरकार कडून रोज नव्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या जात आहेत.
देशातील कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून कमी होत आहे. मात्र कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांचं प्रमाण वाढत आहे. त्यातच आता केंद्र सरकारनं कोरोना चाचण्यांवरून पुन्हा मोठा यू टर्न घेतला आहे.
कोरोना चाचण्यांमधील आरटीपीसीआर चाचण्यांचं प्रमाण ७० टक्क्यांवरून ४० टक्क्यांवर आणण्याची तयारी केंद्रानं सुरू केली आहे. आरटीपीसीआर चाचणी सर्वाधिक विश्वसनीय मानली जाते. मात्र आता सरकारनं एकूण चाचण्यांमधील याच चाचणीचं प्रमाण कमी करण्याचं ठरवलं आहे.
कोरोनाचं निदान करण्यासाठी करण्यात येणाऱ्या एकूण चाचण्यांमध्ये आरटीपीसीआर चाचण्यांचं प्रमाण ७० टक्के असायला हवं, असं खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं होतं.
मात्र आता आरटीपीसीआर चाचण्या ४० टक्क्यांवरून आणून अँटिजन चाचण्यांचं प्रमाण ६० टक्क्यांवर नेण्याची तयारी सरकारनं सुरू केली आहे. जूनच्या अखेरपर्यंत दैनंदिन चाचण्यांचं प्रमाण ४५ लाख करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
एकूण चाचण्यांमध्ये आरटीपीसीआर चाचण्यांचं प्रमाण ७० टक्के असायला हवं, असा सल्ला खुद्द पंतप्रधान मोदींनी दोन महिन्यांपूर्वी राज्यांना दिला होता. 'पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जास्त येत असल्यास असू द्या. तुमच्यावर कोणताही दबाव नाही,' असं मोदी म्हणाले होते. आता सरकारनं आरटीपीसीआर चाचण्यांची क्षमता कमी केली आहे. गेल्या आठवड्यात दिवसाकाठी १६ लाख आरटीपीसीआर चाचण्या केल्या जात होत्या. आता हीच क्षमता कमी करण्यात आली आहे. ती १२ ते १३ लाखांवर आणली गेली आहे. विशेष म्हणजे सरकारनंच ही आकडेवारी दिली आहे.
जूनच्या अखेरपर्यंत आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या १८ लाखांपर्यंत नेण्याचं लक्ष सरकारनं ठेवलं आहे. मात्र त्यावेळी एकूण चाचण्यांची संख्या ४५ लाख इतकी असेल. याचा अर्थ एकूण चाचण्यांमध्ये आरटीपीसीआर चाचण्यांचं प्रमाण केवळ ४० टक्के असेल. आरटीपीसीआरच्या गोल्ड स्टँडर्ड टेस्टऐवजी स्टँडर्ड टेस्ट करण्याचा सरकारचा इरादा आहे. काल आरोग्य मंत्रालयाची पत्रकार परिषद झाली. एप्रिल-मे महिन्यांत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान आरटीपीसीआर आणि अँटिजन टेस्टचं प्रमाण ५०-५० टक्के होतं अशी माहिती त्यावेळी देण्यात आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी ही करुणा बाबतीत वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्याचे आव्हान केले आहे. परंतु आजही भाजप नेत्यांकडून गोमूत्र आणि अवैज्ञानिक गोष्टी कोरोना बरा करण्याचे दावे केले जात आहेत. जानेवारी 2019 मध्ये स्वतःला महाविश्वगुरू म्हणून घेणाऱ्या भारताला आज जगापुढे कोरोना लसीसाठी विनवण्या करण्याची वेळ आली आहे. सुरुवातीला कोरोना नियंत्रणासाठी फक्त 21 दिवसांची मागणी करणारे मोदी दीड वर्षानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर सपशेल अपयशी ठरल्याचं आंतराष्ट्रीय माध्यमांचं म्हणणे आहे