Home > News Update > मोदींचा आणखी एक नवा 'मास्ट्ररस्ट्रोक'

मोदींचा आणखी एक नवा 'मास्ट्ररस्ट्रोक'

दुस-या लाटेच्या कोरोना व्यवस्थापनावरून आंतरराष्ट्रीय माध्यमांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठल्यानंतरसध्या देशात सोशल मीडियावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलाच वाद पेटला आहे.

मोदींचा आणखी एक नवा मास्ट्ररस्ट्रोक
X

पंतप्रधान मोदींची प्रतिमा खराब करण्यासाठी काँग्रेस(Congress) टूलकिटचा(Toolkit) वापर करत असल्याचा आरोप भाजपाने(BJP) केला आहे. त्यानंतर जगप्रसिद्ध ई कॉमर्स वेबसाईट अमेझॉनवरील 'मोदींचा मास्टरस्ट्रोक' या पुस्तक विक्रीचा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे.

कोरोना काळात लोकांनी नोकऱ्या गमावल्या यावरून अमेझॉनवर उपहासात्मक पुस्तक विक्रीला ठेवलं होतं. यात बेरोजगारी राखण्यासाठी पंतप्रधानांची कामगिरी यावर हे पुस्तक आहे. या पुस्तकाचं नाव 'मास्टरस्ट्रोक' (Masterstroke) असं लिहिलं असून त्याचे लेखक बेरोजगार भक्त या टोपणनावानं प्रकाशित करण्यात आलं आहे.

अमेझॉनच्या वेबसाईटवर कित्येक वेळ हे पुस्तक विक्रीला ठेवलं होतं. त्यात नरेंद्र मोदींच्या फोटोचं मुखपृष्ठ होतं. "मास्टरस्ट्रोक 420 secrets that helped PM in India's employment growth" या नावानं भारताच्या रोजगार वाढीसाठी मदत करणारं पंतप्रधानांची ४२० रहस्य याबाबत उघड करणारं पुस्तक असल्याचं सांगितलं गेलं. ५६ पानांच्या या पुस्तकात सगळी पानं कोरी ठेवण्यात आली आहेत. ते किंडल डाऊनलोड करता येईल आणि त्याची किंमत ५६ रुपये ठेवण्यात आली आहे. देशातील बेरोजगारीच्या वाढत्या लाटेला बळी पडलेल्या भक्तानं लिहिलेलं पुस्तक असल्याचं दाखवलं गेले. माहितीनुसार हे पुस्तक झारखंडमधील एका इंजिनिअरनं बेरोजगारीमुळे ही कल्पना सुचल्याचं म्हटलं आहे.

किंडल पब्लिकेशन कसे काम करते हे तपासण्यासाठी हे केलं. काहीतरी नवं करून लोकांना हसवण्यासाठी मी १५ मिनिटाच्या संकल्पनेत हे पुस्तक तयार केले आणि अमेझॉनवर विक्रीसाठी ठेवलं. त्यानंतर वेबसाईटनुसार अमेझॉनवर युजर्सला काही पुस्तकं मिनिटांसाठी प्रकाशित करता येतात.

या पुस्तकाबद्दलची माहिती देताना, "एका महान नेत्याने अडथळत वाटचाल कऱणाऱ्या देशाला करोनाविरुद्धच्या लढाईमध्ये कसा विजय मिळवून दिला आणि देशाला भरभराटीच्या मार्गावर कसं आणलं याची ही कथा आहे," असं म्हटलं आहे. या पुस्तकावर ट्विटरवरुनही अनेकांनी प्रतिक्रिया नोंदवल्यात.





विशेष म्हणजे अनेकांनी या पुस्तकाचे रिव्ह्यूही लिहिले आहेत. एकदम पटकन वाचून झालं हे पुस्तक, नावात वापरलेला ४२० क्रमांक अगदी योग्य आहे या आणि अशाप्रकारच्या अनेक कमेंट या पुस्तकाच्या रिव्ह्यूमध्ये करण्यात आल्यात. अमेझॉन साईटवर ते २ दिवस विक्रीला ठेवता येते. आता हे पुस्तक अमेझॉनवर उपलब्ध नाही असं कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे.

हे पुस्तक प्रकाशित करणारा नक्की 'भक्त बेरोजगार'कोण आहे? याची माहिती आणि खरं नाव समोर आलं नसलं तरी नेटकऱ्यांना या निमित्ताने चर्चेसाठी एक विषय मिळाला आहे.

Updated : 27 May 2021 11:32 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top