Ukraine Russia Crisis: भारतीयांना आणण्यासाठी 4 मंत्री जाणार
X
रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यात हजारो लोकांचा जीव गेल्याचे आकडे समोर येत आहेत. रशियाच्या हल्ल्याने युक्रेन मधील लोकांचे जनजीवन विस्कळीत झालं आहे. लाखो लोकांचे आयुष्य उद्धस्थ झालं आहे. सर्व यंत्रणा ठप्प पडल्या आहेत. या सगळ्या युद्धात युक्रेनमध्ये मेडिकलच्या शिक्षणासाठी आणि कामानिमित्त गेलेले सुमारे 20 हजार नागरिक अडकले आहेत.
भारत सरकारने भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी मिशन गंगा च्या नावाने मोहीम सुरू केली आहे. युक्रेन मध्ये अडकलेल्या या भारतीयांना परत आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. या बैठकीत भारत सरकारचे 4 मंत्री या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी जाणार असल्याचं निर्णय घेण्यात आला आहे.
या मंत्र्यांमध्ये हरदीप सिंह पुरी, ज्योतिरादित्य सिंधिया, किरण रिजिजू आणि जनरल वीके सिंह या नेत्यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित झालेल्या हाय लेव्हल बैठकीत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला, राष्ट्रीय सुरक्षा सलाहकार अजीत डोभाल उपस्थित होते.
युक्रेन अडकलेल्या विद्यार्थ्यांचे व्हिडीओ समोर आले आहेत. त्यामध्ये हे विद्यार्थी भारत सरकार आमच्यासाठी काहीच करत नसल्याचा आरोप करत आहेत. त्यानंतर भारत सरकार ने हा निर्णय घेतला.