उत्तर प्रदेशमध्ये येऊनही मोदींचं लखीमपूर घटनेवर मौन का?
X
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीमध्ये शेतकऱ्यांना केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने उडवल्याच्या आरोपाने देशभरात खळबळ उडाली आहे. सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मित्रा याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे, पण त्याला अटक झालेली नाही. त्यामुळे अजय मिश्रा यांचा राजीनामा घ्या आणि आशिषला अटक करावी, अशी मागणी विरोधकांनी केली आहे.
याच मुद्द्यावरुन सोशल मीडियावर देखील सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. याच मुद्द्यावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अद्यापही मौन बाळगून आहेत. देशाच्या अन्नदात्याना भाजप चे कार्यकर्ते अशा पद्धतीने गाडीने उडवून देत आहेत. मात्र, मोदी अजुनही शांत का? असा सवाल उपस्थित होत असताना मोदी आज उत्तरप्रदेश च्या दौऱ्यावर आहे.
त्यांच्या हस्ते लखनऊ येथे 'न्यू अरबन इंडिया' या तीन दिवसीय कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. या कार्यक्रमात मोदी यांच्या हस्ते 75 हजार लोकांना डिजिटल माध्यमांद्वारे घराचं हस्तातरण झालं.
मात्र, मोदींनी ही घर देताना लखीमपूर येथे मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांबद्दल एकही शब्द काढला नाही.पाहा मोदी यांचं पूर्ण भाषण