Home > News Update > मोदींची नवी आयडीया: जगात डंका वाजवण्यासाठी आणणारं नवं सरकारी चॅनेल

मोदींची नवी आयडीया: जगात डंका वाजवण्यासाठी आणणारं नवं सरकारी चॅनेल

मोदींची नवी आयडीया: जगात डंका वाजवण्यासाठी आणणारं नवं सरकारी चॅनेल
X

देशातील गोदी मिडीया सरकारधर्जिना असला तर कोरोना संकटाच्या निमित्तानं आंतराष्ट्रीय माध्यमांनी मोदींच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानं आता जागतिक पातळीवर भारताची 'भुमिका' मांडण्यासाठी बीबीसी वर्ल्डच्या धर्तीवर मोदी सरकार हे डीडी इंटरनॅशनल चॅनेल लवकरच लॉंच करणार आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारित येणारे दूरदर्शनच्या वतीने हे चॅनेल सुरु करणार आहे. डीडी इंटरनॅशनल असं या नव्या चॅनेलचं नाव आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग वाढल्यानंतर देशी माध्यमं पॉझिटीव्हीटी पसरवत असताना न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंगटन पोस्ट, द गार्डीयन, बीबीसी,द ऑस्ट्रेलियन आणि सर्व प्रमुख जागतिक माध्यमांनी मोदी सरकारवर टीका करत नेतृत्व अपयशी ठरल्याचं म्हटलं होतं. या सर्व टीकेला उत्तर देण्याचा प्रयत्न परराष्ट्र मंत्रालयाकडून करण्यात आला. परंतु त्याला यश मिळाले नाही. भारतात तयार झालेल्या कोरोना विषाणु व्हँरिअन्ट मुळं जगाची चिंता वाढल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) जाहीर केल्यानंतर सरकार चांगलचं अडचणीत आलं.

देशातील अंतर्गत प्रकरणे आणि जागतिक विषयांवर भारताची भुमिका आणि आवाज जागतिक पातळीवर मांडण्यासाठीचे व्यासपीठ म्हणून या चॅनेलची निर्मिती आता वेगानं केली जाणार आहे. डीडी इंडिया हे दूरदर्शनचे इंग्रजी बातम्यांसाठीचे तसेच करंट अफेअर्ससाठीचे चॅनेल असून जागतिक पातळीवरचा प्रेक्षक खेचण्यासाठीचे काम या चॅनेलच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला जातो. डीडी इंडियाचं नाव डीडी वर्ल्ड असंही मध्यंतरी दिलं गेलं होतं. मात्र 2019 मध्ये पुन्हा ते डीडी इंडिया असंच करण्यात आलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, प्रसार भारतीमध्ये गेल्या‌ काही दिवसांपासून याबाबत काटेकोरपणे नियोजन सुरु आहे. तसेच वितरणाची चॅनेलची जय्यत तयारी सुरू आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रसार भारती डीडी इंटरनॅशनल चॅनेल बीबीसी वर्ल्डप्रमाणेच खरोखरच एक जागतिक पातळीवरचे चॅनेल ठरेल, असे ध्येय ठेवण्यात आले आहे. फक्त भारतीय परिप्रेक्ष्यात नव्हे तर जागतिक पातळीवरचा प्रेक्षक वर्ग खेचण्याचं ध्येय यामध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यामुळेच यासाठी डीपीआर व रोडमॅप तयार करण्यासाठी खासगी सल्लागार घेण्याचे ठरविण्यात आल्याचंही सुत्राकडून समजलं आहे.

Updated : 20 May 2021 8:38 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top