Home > News Update > "पोटनिवडणूकीतील पराभवामुळेच मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले"

"पोटनिवडणूकीतील पराभवामुळेच मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले"

पोटनिवडणूकीतील पराभवामुळेच मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले
X

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असताना केंद्र सरकारने काहीसा दिलासा दिला आहे. सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याची घोषणा केली आहे. पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क गुरुवारपासून 5 आणि 10 रुपयांनी कमी होणार आहे. मात्र, मोदी सरकारच्या या सवलतीच्या निर्णयावर काँग्रेसने जोरदार हल्ला चढवला आहे. "पोटनिवडणूकीतील पराभवामुळेच मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले, असल्याची टीका काँग्रेसचे वरिष्ठ नेते रणदीप सुरजेवाल यांनी केली आहे.

रणदीप सुरजेवाल यांनी ट्विट करत म्हंटले आहे की, "यंदा पेट्रोलच्या दरात 28 रुपये आणि डिझेलच्या दरात 26 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. मात्र देशातील 14 जागांवरील पोटनिवडणुकीत झालेल्या पराभव पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 5 रुपये आणि 10 रुपयांची कपात आता पंतप्रधानांची दिवाळीची भेट ठरली का ? है? हे राम! हद है.." अशी टीका सुरजेवाल यांनी केली आहे.

रणदीप सुरजेवाला म्हणाले की, "टैक्सजीवी मोदी सरकारला धडा शिकवल्याबद्दल देशवासीयांचे अभिनंदन करतो. लोकशाहीत "वोट की चोट" मुळे भाजपला सत्याचा आरसा दिसला. लक्षात ठेवा मे 2014 मध्ये, पेट्रोल ₹71.41 आणि डिझेल ₹55.49 होते, तेव्हा कच्चे तेल 105.71 डॉलरला बॅरल होते. आज कच्चे तेल 82 डॉलर प्रति बॅरल आहे. त्यामुळे 2014 च्या बरोबरीची पेट्रोलची किंमत कधी होईल?," असा प्रश्न सुद्धा सुरजेवाला यांनी उपस्थित केला आहे.

वागळेंची टीका...

जेष्ठ पत्रकार निखील वागळे यांनी सुद्धा याच मुद्यावर बोलताना म्हंटले आहे की, "पोटनिवडणुकांत फटका बसल्याने मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलवरचे कर किंचित कमी केले म्हणे. तसं असेल तर आणखी किती मोठा फटका द्यायला पाहिजे लक्षात घ्या," असा टोला त्यांनी लगावला आहे.

Updated : 4 Nov 2021 9:26 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top