Home > News Update > अण्णांचा उपोषणाचा निर्धार कायम, उद्या केंद्राचा नवा प्रस्ताव

अण्णांचा उपोषणाचा निर्धार कायम, उद्या केंद्राचा नवा प्रस्ताव

अण्णा हजारेंनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उपोषणाचा इशारा आहे. भाजप नेते गिरीश महाजन यांनी पुन्हा अण्णांची भेट घेतल्यानंतर महत्त्वाची माहिती दिली आहे.

अण्णांचा उपोषणाचा निर्धार कायम, उद्या केंद्राचा नवा प्रस्ताव
X

अहमदनगर : एकीकडे दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन चिघळले असताना आता ज्य़ेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ३० जानेवारीपासून उपोषणाचा निर्धार केला आहे. शेती मालाला दीडपट हमीभाव मिळावा आणि स्वामीनाथन आयोगाला स्वायत्तता द्यावी या मागणीसाठी ३० जानेवारीपासून अण्णा आंदोलनाला बसणार आहेत.

एकीकडे देशाच्या राजधानीत झालेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जर अण्णा हजारेंनी आंदोलन पुकारलं तर केंद्र सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता राज्यातील भाजप नेत्यांकडून अण्णांची मनधरणी करण्याचं काम सुरु आहे.

भाजपचे नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी गुरूवारी अण्णांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना महाजन यांनी चर्चा सकारात्मक झाल्याचे सांगत अण्णांनी मागणी केलेली उच्चाधिकार समिती गठीत करण्याचा निर्णय तातडीने होणार आहे, त्यावरील नवीन प्रस्ताव शुक्रवारीच अण्णांना सादर केला जाईल. त्यामुळे आंदोलनाची वेळ अण्णांवर येणार नाही असा विश्वास गिरीश महाजन यांनी यावेळी व्यक्त केला.

Updated : 28 Jan 2021 3:06 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top