Home > News Update > मोदी सरकारचा Digital Strike, चार पाकिस्तानी चॅनलसह 22 युट्यूब चॅनल्स ब्लॉक

मोदी सरकारचा Digital Strike, चार पाकिस्तानी चॅनलसह 22 युट्यूब चॅनल्स ब्लॉक

खोटी माहिती पसरवत असल्याचा ठपका ठेवत 4 पाकिस्तानी चॅनल्ससह 22 चॅनल्स माहिती व प्रसारण मंत्रालयाने ब्लॉक केल्याचे माहिती व प्रसारण मंत्रालयाने प्रसिध्दीपत्रकाच्या माध्यमातून सांगितले आहे.

मोदी सरकारचा Digital Strike, चार पाकिस्तानी चॅनलसह 22 युट्यूब चॅनल्स ब्लॉक
X

मोदी सरकारने सार्वजनिक सुव्यवस्था, राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र संबंधांबद्दल चुकीची माहिती पसरवल्याबद्दल माहिती व प्रसारण मंत्रालयाने 22 चॅनल्स ब्लॉक केले आहेत. त्यापैकी चार चॅनल्स हे पाकिस्तानी आहेत. याबरोबरच 3 ट्वीटर अकाऊंट, एक फेसबुक अकाऊंट आणि एक न्यूज वेबसाईटही ब्लॉक करण्यात आल्याचे वृत्त आहे.

यापुर्वी जानेवारी महिन्यात केंद्र सरकारने 35 युट्यूब चॅनल्स ब्लॉक केले होते. त्यात माहिती व प्रसारण मंत्रालयाला मिळालेल्या माहितीनुसार 35 युट्यूब चॅनल्स, २ ट्वीटर अकाऊंट, २ इंस्टाग्राम अकाऊंट, एक फेसबुक अकाऊंट आणि दोन वेबसाईट ब्लॉक करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या चॅनल्सवरून देशविरोधी माहिती प्रसारित करण्यात येत होती. तसेच भारताच्या परराष्ट्र धोरणांवर परिणाम करणारा आशय दिल्यामुळे या चॅनल्सवर कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

या चॅनल्सच्या माध्यमातून काश्मीर, भारतीय लष्कर, राम मंदिर, बिपीन रावत आणि अल्पसंख्यांक समुदायामध्ये फुट पाडणारा मजकूर पोस्ट करण्यात आला होता. त्यामुळे या चॅनल्सवर भारतीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने कारवाईचा बडगा उचलला आहे.

Updated : 5 April 2022 6:34 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top