Home > News Update > केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा, राज्यातून कुणाला संधी मिळणार?

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा, राज्यातून कुणाला संधी मिळणार?

मोदींच्या मंत्रिमंडळ विस्ताराची सध्या जोरदार चर्चा आहे. या विस्तारात कशाचा आणि कुणाचा विचार केला जाऊ शकतो, याचे तर्कवितर्क सध्या लढवले जात आहेत.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा, राज्यातून कुणाला संधी मिळणार?
X

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुसऱ्यादां पंतप्रधान झाल्यानंतर तब्बल दोन वर्षांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. याचसंदर्भात मंगळवारी पंतप्रधान मोदी महत्त्वाची बैठक घेणार असल्याची चर्चा आहे. रे तर सत्ताधारी पक्षातर्फे कोणीही यावर भाष्य करत नसले तरी मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही असेही सांगितलेले नाही. दरम्यान गेल्या दोन वर्षात राजकीय परिस्थितीत बरीच बदलली आहे. त्यामुळे या विस्तारात कोणकोणते मुद्दे विचारात घेतले जाऊ शकतात, यावर अऩेक माध्यमांनी अंदाज व्यक्त केले आहेत.

मंत्रिमंडळ विस्तारावर कशाचा परिणाम होऊ शकतो?

1. प.बंगालमध्ये भाजपचा मोठा पराभव

2. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या कारभाराबाबत असलेली पक्षांतर्गत नाराजी

3. महाराष्ट्रात शिवसेना भाजपपासून वेगळी झाली

4. गुजरात, पंजाब, हिमाचल प्रदेश, मणीपूर आणि गोवा या राज्यांच्या येत्या विधानसभा निवडणुका

5. NDAमधील घटकपक्षांची नाराजी

कुणाकुणाला संधी मिळण्याची शक्यता?

मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातून कुणाला संधी मिळणार याची चर्चा आहे. यामध्ये दोन नावांची प्रामुख्याने चर्चा आहे, ती म्हणजे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणनवीस आणि खासदार नारायण राणे...पण सध्या ही केवळ चर्चा आहे.

तर दुसरीकडे ज्योतिरादित्य शिंदे यांना मंत्रीपद दिले जाण्याची शक्यता आहे. ज्योदिरादित्य शिंदे यांच्यासोबत काही आमदारही आल्याने भाजपला मध्य प्रदेशात पुन्हा सत्ता मिळवता आली. त्यामुळे शिंदे यांचा विचार करावा लागणार आहे, असे सांगितले जात आहे.

आसाममध्ये पक्षाला भक्कम करुन पुन्हा सत्ता मिळवून देणाऱ्या माजी मुख्यमंमत्री सरबनंदा सोनवाल यांचाही विचार केला जाण्याची शक्यता आहे.

लोकजनशक्ती पार्टीमध्ये सध्या मोठी फूट पडली आहे. त्यामुळे मोदी चिराग पासवान यांना जवळ करतात की त्यांना अध्यक्षपदावरुन दूर करणाऱ्या खासदारांना ते कळण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशात भाजपसोबत असलेल्या अपना दललासुद्धा जागा मिळते का ते पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.

Updated : 6 July 2021 10:15 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top