Modi Biden Meet | लोकशाही आणि लोकशाही मूल्यांना सशक्त करणे हाच आमचा मुलमंत्र- पंतप्रधान मोदी
X
Modi Biden Meet : पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदी यांनी लोकशाही मुल्यांना सशक्य करणे, हाच आमचा मंत्र असल्याचे म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी (PM Modi America Visit) हे अमेरिका दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात अनेक उद्योजक, राजकीय नेते, सांस्कृतिक प्रतिनिधी यांच्या भेटी घेतल्या. मात्र पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेण्यापुर्वीच अमेरिकेतील 75 खासदारांनी पत्र लिहून मोदींचे स्वागत करा, पण भारतातील विरोधी पक्षाला संपवण्याचा प्रयत्न करणे, विचारवंत, साहित्यिक आणि पत्रकारांना लक्ष्य करणे याबरोबरच धार्मिक असहिष्णूता व माध्यमांना प्रतिबंध यासारख्या मुद्द्यावर चिंता व्यक्त करण्याची विनंती केली होती. (America Member of parliament and member of congress wrote letter to Biden)
भारतात लोकशाहीची कुचंबना होत असल्याचे या 75 खासदारांनी लिहीलेल्या पत्रात म्हटले होते. मात्र दुसरीक़डे पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, आमच्या सगळ्या प्रयत्नांचा सार हा लोकशाही आणि लोकशाही मुल्यांना मजबूत (Make a strong democracy) आणि सशक्त करणे हाच आहे. जगातील सगळ्यात मोठे दोन लोकशाही देश विश्वशांतीसाठी (Peace in World) सहयोग देऊ शकतात. त्यामुळे लोकशाहीसाठी फक्त आमच्या दोनच देशांचे नाही तर सगळ्या जगाचे लक्ष आमच्याकडे लागले असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.