Home > News Update > भोंग्याच्या प्रकरणावरुन वसंत मोरे यांची मनसेच्या पुणे शहर अध्यक्षपदावरुन उचलबांगडी

भोंग्याच्या प्रकरणावरुन वसंत मोरे यांची मनसेच्या पुणे शहर अध्यक्षपदावरुन उचलबांगडी

भोंग्याच्या प्रकरणावरुन वसंत मोरे यांची मनसेच्या पुणे शहर अध्यक्षपदावरुन उचलबांगडी
X

गुढीपाडव्याला राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे काढून न टाकल्यास त्यासमोर मोठ्या आवाजात हनुमान चालिसा लावण्यासंदर्भात वक्तव्य केलं होतं.त्यानुसार काही कार्यकर्त्यांनी हनुमान चालिसेचा जाप सुरु केला.मात्र मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी भोंगे लावणार नसल्याचं जाहीर केलं.त्यामुळे मनसेमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचं चित्र निर्माण झालं.अखेर वसंत मोरे यांची पुणे शहर अध्यक्षपदावरुन उचलबांगडी करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.

मनसेने अधिकृत फेसबुक अकाऊंटवरुन याबाबत घोषणा केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने आज नगरसेवक साईनाथ बाबर यांची पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.राज ठाकरे साईनाथ बाबर यांना जबाबदारीसंदर्भातलं पत्र सोपवत असल्याच्या फोटो देखील पोस्ट करण्यात आला आहे.

दरम्यान, मी अकरा महिन्यांसाठीच शहरध्यक्षपद राज ठाकरे यांच्याकडून मागून घेतले होते. साईनाथ बाबर यांची निवड झाली आहे. मला अनेक पक्षांच्या ऑफर आहेत. मी मात्र मनसेतच राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाणार नाही. पक्षाचा कार्यकर्ता आहे. पक्षातच राहीन, असं वसंत मोरे म्हणाले आहेत.

गुढी पाडव्याला राज ठाकरेंनी ही भूमिका मांडल्यानंतर मनसेच्याच काही मुस्लीम कार्यकर्त्यांनी देखील आपली नाराजी बोलून दाखवली आहे. राज ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन करण्यात अलेल्या ठिकाणी त्यांचं नाव देखील खोडून टाकण्याचा प्रकार समोर आला आहे.

Updated : 7 April 2022 5:53 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top