Home > News Update > राज ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल

राज ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल

राज ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल
X

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कंबरेचा स्नायू दुखावला गेल्याने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राज यांना बसण्यासाठी त्रास जाणवत होता. त्यानंतर त्यांनी तीन दिवसांपुर्वीच लिलावती रुग्णालयात जाऊन MRI चाचणी केली होती.


या चाचणीच्या अहवालानुसार राज यांच्या स्नायुवर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. ही शस्त्रक्रिया छोटीशी असून राज यांची शस्त्रक्रिया झाल्यानंतर एका दिवसात घरी सोडलं जाणार आहे. आज कोरोना संदर्भात सर्व पक्षीय बैठक पार पडली या बैठकीत राज ठाकरे अनुपस्थित होते. त्यानंतर राज यांना स्नायू दुखीचा त्रास जाणवल्यानं हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.

Updated : 10 April 2021 10:15 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top