आपण पुढे नेमकं काय करायचं, हे मी उद्या माझ्या ट्विटद्वारे आपल्यासमोर मांडेन..ईदच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन
X
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंनी औरंगाबादमध्ये सभा घेतली होती.या सभेत भोंग्याबाबतीत राज ठाकरे आक्रमक झाले होते.सरळ सांगून भोंगे निघणार नसतील तर मग होऊन जाऊ द्या,असं वक्तव्य जाहीर सभेत केलं होतं.मात्र आता ईदच्या पार्श्वभूमीवर पत्राद्वारे राज ठाकरेंनी महाराष्ट्र सैनिकांना एक आवाहन केल आहे.
राज ठाकरे यांनी ट्विटरवरुन पोस्ट केलेल्या एका आवाहनामध्ये ईदच्या दिवशी मुस्लिमांना त्यांचा सण आनंदाने साजरा करु द्या असं म्हटलंय. "उद्या ईद आहे. कालच्या औरंगाबादच्या सभेमध्ये त्याबाबतीत मी बोललो आहेच. मुस्लीम समाजाचा हा सण आनंदाने साजरा व्हावा. आधी ठरवल्याप्रमाणे अक्षय्य तृतीया या आपल्या सणाच्या दिवशी कुठेही आरत्या करु नका आपल्याला कोणाच्याही सणात कोणतीही बाधा आणायची नाही. भोंग्यांचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे आणि त्याबाबत आपण पुढे नेमका काय करायचं, हे मी उद्या माझ्या ट्विटद्वारे आपल्यासमोर मांडेन, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र सैनिकांसाठी... pic.twitter.com/zNxanlUVpg
— Raj Thackeray (@RajThackeray) May 2, 2022
महाराष्ट्रात नाही तर देशातील भोंगे हटविले पाहिजेत असे बजावताना, सरळ सांगून करत नसतील त्यांना आता एकदा महाराष्ट्राच्या मनगटात काय ताकद आहे, हे दाखवूनच द्या असे आव्हान राज यांनी औरंगाबादच्या सभेत केलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी अक्षय्य तृतीयेनिमित्त आरत्या आणि पूजा आयोजित केलेल्या. मात्र अशाप्रकारचे कोणतेही कार्यक्रम ईदच्या दिवशी करु नका असं राज यांनी आता कार्यकर्त्यांना सांगितलंय.